२०२५ च्या बजेटमध्ये या गोष्टी महागल्या आणि स्वस्त झाल्या

    दिनांक :01-Feb-2025
Total Views |
नवी दिल्ली,
cheaper in 2025 budget संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी ते ४ एप्रिल या कालावधीत दोन भागात होणार आहे. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या तात्पुरत्या कॅलेंडरनुसार, अधिवेशनाची सुरुवात ३१ जानेवारी रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाले . १ फेब्रुवारी म्हणजेच आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करत केला .आपण जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत. अर्थमंत्र्यांनी याला आकांक्षांचा अर्थसंकल्प म्हणून संबोधले आणि सांगितले की सरकारने सर्व घटकांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. बजेटमध्ये कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आणि कोणत्या महागड्या वस्तूंच्या यादीत समाविष्ट झाल्या ते पाहूया.
 
 
 
cheaper in 2025 budget
या गोष्टी स्वस्त झाल्या
  1. मोबाईल फोन स्वस्त झाले
  2. कर्करोगाची औषधे स्वस्त झाली
  3. वैद्यकीय उपकरणे स्वस्त होतील
  4. एलसीडी, एलईडी स्वस्त झाले
  5. ६ जीवनरक्षक औषधे स्वस्त झाली
  6. ८२ वस्तूंवरील उपकर हटवण्याची घोषणा
  7. भारतात बनवलेले कपडे स्वस्त होती
  8. सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवर कर सवलत दिली आहे. यामुळे बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या स्वस्त होऊ शकतात.
  9. चामडे आणि त्याच्या उत्पादनांवरील कर कमी करण्यात आले आहेत, ज्यामुळे वस्तू स्वस्त होतील.
काय महाग झाले?
अर्थसंकल्पात, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरील मूलभूत सीमाशुल्क १० टक्क्यांवरून २० टक्के करण्यात आले.