१३ तारखेपासून वर्धिनी मिनी सरस प्रदर्शनी व विक्री महोत्सव

    दिनांक :11-Feb-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Wardha News : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या वतीने मिनी सरस वर्धिनी महोत्सव व महा आवास अभियान 2024-25 च्या जिल्हा स्तरीय कार्यशाळेचे आयोजन 13 ते 17 फेब्रुवारी दरम्याान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे नागरिकांनी या महोत्सवाचा व कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेदच्या वतीने करण्यात आले आहे.
 
 
umed
 
सर्कस मैदान येथे आयोजित पाच दिवसीय वर्धिनी महोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खा. अमर काळे, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. राजेश बकाने, आ. सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
 
 
महोत्सवात ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल राहणार आहे. कवी संमेलन, आर्केस्ट्रा बॅण्ड, नृत्य स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्यासंख्येंने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापन निरज नखाते यांनी केले आहे.