नागपूर,
Trimurti Nagar- Nagpur श्री सद्गुरू गजानन महाराज सेवाभावी मंडळ आणि भक्तगणांतर्फे नगरातील तलमले इस्टेट येथील संत श्री गजानन महाराज मंदिरात मंगळवार ११ ते २१ फेब्रुवारीपर्यंत गजानन महाराज प्रकटदिन महोत्सवाचे आयोजन केले आहे. मंगळवारी सकाळी ७ ते ९ पर्यंत श्रीची आरती, अभिषेक, हरिपाठाचे आयोजन केले आहे. दुपारी चार वाजता ज्ञानेश्वरी भागवत सुरु होणार आहे. १२ ला सकाळी गणेश पूजन, मंडप स्थापना, पूजन, देहशुद्धी प्रायश्चित्त आणि पुण्यवाचन तर रात्री आठ वाजता सुरभी भजन मंडळाच्या उत्तरा माहोरे यांचे भजन आहे.
२१ फेब्रुवारीपर्यंत दुपारी ४ ते ७ पर्यंत संत शामनारायण दास महाराज यांचे भागवत होणार आहे. याशिवाय गुरुदेव दत्त भजन मंडळ रमना मारोती, टी पाईन्ट हिंगणा येथील गुरुदेव सेवा मंडळाचे भजन, स्वर निनिद मंडळ, सुगम संगीत नानोटी परिवार, आरोही संगीत केळकर परिवार, संतकृपा वारकरी भजन मंडळ, भक्तीनाद भजन मंडळाचे भजन होणार आहे. १८ फेब्रुवारीला विनोद वखरे यांचे विजय ग्रंथाचे संगीतमय पारायण होणार आहे. Trimurti Nagar- Nagpur २० फेब्रुवारीला प्रकटदिनानिमित्त सकाळी ८ पासून रुद्राभिषेक व आरती होईल. ११ वाजता उमेश बारापात्रे महाराज यांचे गोपालकाल्याचे कीर्तन, दुपारी वाजता गजानन महाराजांच्या मुकुटाची पालखी निघेल. ८०० हून अधिक दिंड्या सहभागी होणार आहेत. २१ मार्चला महाप्रसादाचे आयोजन केले आहे.