भगवान जगन्नाथांचा 'महाप्रसाद' केमिकल फ्री होणार

"अमृत अन्न " कस बनवला जाईल, जाणून घ्या

    दिनांक :14-Feb-2025
Total Views |
Jagannath puri mandir ओडिसाचे पुरी जगन्नाथ मंदिर केवळ देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. जगन्नाथ मंदिराचे स्वयंपाकघर देखील खूप प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की, देवी लक्ष्मी या स्वयंपाकघराची काळजी घेते. मंदिरात बनवल्या जाणाऱ्या महाप्रसादाला खूप महत्त्व आहे. आता राज्य सरकारने हा महाप्रसाद रसायनमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता जगन्नाथ मंदिराचा महाप्रसाद तयार करण्यासाठी सेंद्रिय तांदूळ आणि भाज्यांचा वापर केला जाईल. हा विशेष प्रकल्प 'अमृत अन्न' या नावाने सुरू केले जाईल. प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे.
 
 
  
odisha
 
 
 
या संदर्भात, Jagannath puri mandir ओडिशाच्या सरकारी अधिकाऱ्यांची एक बैठक झाली आहे. त्यानंतर, जगन्नाथ मंदिराच्या सेवकांनी या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. श्री जगन्नाथ मंदिर कायदा, १९५५ अंतर्गत राज्य सरकारच्या श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीद्वारे मंदिराचे प्रशासन आणि कारभार पाहिला जातो.
 
महाप्रसाद कोण बनवतो?
सुअर-महासुअर Jagannath puri mandir निजोग हा या मंदिरातील सेवकांचा एक वर्ग आहे. भगवान जगन्नाथाच्या मंदिरासाठी फक्त सुअर-महासुअर निजोगच प्रसाद तयार करतात. सुअर-महासुअर निजोग सोबतच, मंदिर प्रशासनानेही महाप्रसादात सेंद्रिय तांदूळ आणि भाज्या वापरण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सध्या, मंदिराच्या महाप्रसादासाठी तांदूळ, भाज्या, डाळी आणि इतर वस्तू स्थानिक बाजारातून खरेदी केल्या जातात. ओडिशा मिल्क फेडरेशनकडून मंदिराला तूप पुरवले जाते.
 
असा तयार होईल 'अमृत अन्न' महाप्रसाद
सुरुवातीला Jagannath puri mandir  'अमृत अन्न' महाप्रसाद ओडिशामध्ये उत्पादित होणाऱ्या 'कालाजीरा', 'पिंपुडीबासा', 'जुबरजा' आणि इतर प्रकारच्या सेंद्रिय तांदळापासून बनवला जाईल असे सांगण्यात येत आहे. यामध्ये, समाविष्ट असलेला कालाजिरा तांदूळ आधीच भौगोलिक निर्देशांक (GI) टॅगमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. गोमूत्र, शेण आणि इतर सेंद्रिय खतांचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने भाताचे उत्पादन केले जाईल. सुरुवातीच्या टप्प्यात, १०० ते २०० एकर जमिनीवर सेंद्रिय तांदूळ उत्पादन करण्याचे लक्ष्य आहे.