- विविध धार्मिक कार्यक्रमांसह ‘सेवा पुरस्कार’
यवतमाळ,
बंजारा समाजाचे श्रद्धास्थान Saint Sewalal Maharaj संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशिम) संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारात आणि प्रमुख उपस्थितीत शनिवारी, १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजतापासून संत सेवालाल मंदिर परिसरात हा जयंती महोत्सव होणार आहे. कार्यक्रमास बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज, कबीरदास महाराज, जितेंद्र महाराज, यशवंत महाराज, महाराज, रायसिंग महाराज, शेखर महाराज, गोपाल महाराज यांच्यासह राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश राठोड, माजी आमदार नीलय नाईक, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिश्चंद राठोड उपस्थित राहणार आहेत.
Saint Sewalal Maharaj : महोत्सवात छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध गायक नरेंद्र राठोड व संच यांचे बंजारा भजन आणि भक्तीगीत गायन होणार आहे. विविध क्षेत्रात विशेष करणार्या बंजारा समाजातील मान्यवरांचा ‘सेवा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पोहरादेवी, उमरी, वसंतनगर, वाई गौळ येथील विकासकामांत विशेष सहकार्य करणार्या शासकीय अधिकार्यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नांतून शासनाने पोहरादेवी विकास आराखडा मंजूर करून येथे कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू केली. पोहरादेवीस आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर ‘बंजारा विरासत’ नंगारा भवन या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पोहरादेवी येथे होत असलेल्या संत सेवालाल महाराज जयंती महोत्सवात यवतमाळ, वाशीम व लगतच्या जिल्ह्यातील बंजारा समाजबांधवांसह नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीने केले आहे.