लाखो रुपये वितरित तरीही सहा वर्गखोल्याचे ‘बांधकाम’

14 Feb 2025 20:30:55
- सीईओंच्या भूमिकेकडे लागले लक्ष

यवतमाळ, 
ZP Yavatmal : जिल्ह्यात क्षतीग्रस्त ७६ वर्गखोल्यांना मागील जिल्हा नियोजन समितीकडून १० कोटी २६ लाख रुपये मंजूर झाले. तरीदेखील वर्षभरात केवळ सहा वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. उर्वरित कामे प्रगतिपथावर असल्याने या बांधकामाबाबत उलटसुलट चर्चाला उधाण आले आहे. जिपच्या २ हजार २०० अधिक शाळा आहेत. यातील बहुतांश शाळांमधील वर्गखोल्या वेगवेगळ्या कारणाने क्षतीग्रस्त झाल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या समस्या गंभीर बनली आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत सर्व शिक्षकांनीसुद्धा वर्गखोली बांधकामासाठी निधी वितरित करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
 
 
ZP Yavatmal
 
त्यामुळे पूर्ण खेळ आता जिल्हा वार्षिक योजनेवरच आहे. गेल्यावर्षी जिप प्राथमिक शिक्षण विभागाने एकूण ७६ वर्गखोली बांधकामाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला होता. या प्रस्तावाला पालकमंत्री संजय राठोड यांनी ‘ग्रीन दिला होता. त्यानंतर प्रती वर्गखोली १३ लाख ५० हजारांप्रमाणे १० कोटी २६ लाख रुपये वितरित केले होते.
 
 
ZP Yavatmal  : त्यानुसार वर्गखोली बांधकामाला सुरवात झाली आहे. आतापर्यंत सहा कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या कामांमध्ये वणी तालुक्यातील निंबा रोड, निळापूर, पुसद तालुक्यातील रोहडा, आर्णीमधील जवळा, बाभुळगाव तालुक्यातील राणीअमरावती, महागाव तालुक्यातील बाभुळगाव या शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही कारणांमुळे दिग्रस तालुक्यातील निंभा येथील शाळेच्या वर्गखोलीचे बांधकाम रद्द करण्यात आले आहे. तब्बल बारा महिने लोटल्यानंतरही केवळ सहाच शाळांमधील वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्णत्वास आल्यामुळे बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
तालुकानिहाय मंजूर झालेल्या वर्गखोल्या
दारव्हा - १३
पुसद - ८
- ७
नेर - ७
यवतमाळ - ७
उमरखेड - ६
महागाव - ५
आर्णी - ५
बाभूळगाव - ३
पांढरकवडा - ३
वणी - ३
झरी - ३
घाटंजी - २
मारेगाव - २
राळेगाव - २
कळंब - १
---------------
एकूण - १६
---------------
Powered By Sangraha 9.0