मारेगाव तालुक्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

    दिनांक :15-Feb-2025
Total Views |
- तालुक्यातील चिंचाळा ते मंगरूळ परिसरात जाणवले धक्के
 
 
मारेगाव, 
Earthquake in Maregaon taluka : शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान सर्वजण आपापल्या घरी शांततेने झोपलेले असताना मारेगाव तालुक्यातील अनेक गावात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. अनेकांना काय झाले कळलेच भीतीने सर्वच आपआपल्या घराच्या बाहेर निघाले. ज्यांचे टीन आणि कौलांचे घर होते, त्यांच्या टीनांचा आवाज आला. काहींच्या घरी भांडे पडल्याचा आवाज झाला. नागरिकांना वाटले ब्लास्टिंगचा वगैरे आवाज असेल, मात्र नंतर कळले की हा भूकंपाचा सौम्य धक्का होता. त्यामुळे नागरिक भीतीने घराच्या बाहेर पडले. काहींनी तर अख्खी रात्र जागून काढल्याची तालुक्यातील पिसगाव, कुंभा, सिंधी मांगरूळ, चिंचाळा तसेच अनेक गावांमध्ये घडली.
 
 
Earthquake
 
मारेगाव तालुक्याला लागून भांडेवाडा ही भूमिगत खाण आहे. तिथे अनेकदा कोळसा काढण्याचे वेळी ब्लास्टिंग केली जाते. ब्लास्टिंगचा आवाज आणि धक्का लोकांना परिचयाचा आहे. परंतु १४ फेब्रुवारीच्या रात्री अंदाजे १०.३० च्या सुमारास रात्री सगळे लोक रात्रीच्या वेळेस घरी शांतपणे झोपलेले अचानक जोराचा आवाज आला. काही लोकांच्या घरची भांडीसुद्धा पडल्याचे सांगण्यात आले. प्रशासकीय स्तरावरून हा धक्का भूकंपाचा की कशाचा, याची अजूनही पुष्टी केलेली नसली तरी नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
 
Earthquake in Maregaon taluka : सुरुवातीला हा धक्का ब्लास्टिंगचा असावा अशीही अनेकांना शंका आली. त्यामुळे नागरिकांनी जवळपास ब्लास्टिंगचे काम कोठे सुरू आहेत का, याची केली. परंतु त्यांना कोठेही ब्लास्टिंग सुरू असल्याचे आढळून आले नाही. याविषयी मारेगाव तहसीलचे तहसीलदार उत्तम निलावाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही अशा प्रकारचे मला कॉल आले मी पिसगाव, सिंधी, कुंभा या गावांना भेटी देऊन चौकशी केली. तसेच याविषयी वरिष्ठ कार्यालयाला माहितीसुद्धा दिली असल्याचे सांगितले.