मुंबई,
Dolly Chaiwala डॉली चहावाला हा नागपूरची एक व्हायरल चहा विक्रेती आहे. २०२४ मध्ये बिल गेट्सना चहा दिल्याने तो जास्तच प्रसिद्धीच्या झाला होता . आता तो बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानला भेटला आहे. दोघांनी व्यवसायाशी संबंधित बाबींवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.
डॉली चायवालाने Dolly Chaiwala इन्स्टाग्रामवर अरबाज खानसोबतच्या भेटीची झलक शेअर केली. डॉलीचे स्वागत करताना अरबाज म्हणाला, 'सुपरस्टार डॉली!!' यावर डॉलीनेही उत्तर दिले, 'जर आपण मला स्टार म्हणतो, तर आपला एकच भाऊ आहे, सलमान भाई.' यानंतर अरबाज खाननेही उत्तर दिले, 'तूही काही कमी नाहीस.'असा सवड दोघांमध्ये झाला.
नेटकरी झाले तिखट
डॉलीने अरबाजसोबतचा व्हिडिओ पोस्ट करताच, वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. एकाने लिहिले, 'अरबाज खानला इतके वाईट दिवस येत आहेत, त्याच्यासोबत व्यवसाय करताय?' दुसऱ्याने विचारले, 'भाऊ, तू त्याच्यासोबत चहाचा व्यवसाय सुरू करत आहेस का?' एकाने लिहिले, 'भाऊ लवकरच चित्रपटात येईल.' दुसऱ्याने लिहिले, 'तो अरबाजपेक्षा श्रीमंत आहे.'
पहा व्हिडिओ आणि कंमेंट