संत ज्ञानेश्वरांचा ज्ञानमूल्य विचार

16 Feb 2025 05:45:00
संत प्रबोधन 
 
Saint Dnyaneshwar : सर्व संतांनी ज्ञानाची महती प्रतिपादित केलेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानाबद्दल आपली ज्ञानाबद्दलची भूमिका ‘ज्ञानेश्वरी’मध्ये विशद केली आहे. ‘हरिपाठ’ हा ग्रंथ त्याची सुलभ भाषा असणारे ज्ञान उपायाची साधनसिद्धी आहे.
 
 
Dnyaneshwar2
 
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान |
समाधी संजीवन हरिपाठ ॥
ज्ञानासारखे पवित्र या जगामध्ये दुसरे काहीही नसून व्यक्तीला पवित्र, पावन, शुद्ध करणारे केवळ ज्ञान आहे. आत्मसाक्षात्काराची ज्याच्या मनाला ओढ लागलेली आहे व ज्याला सर्व विषयांचा वीट आलेला आहे, जो पुरुष कधीही इंद्रियांचे चोचले न पुरविता त्यांच्याप्रमाणे नाही, जो सतत मनाला आवर घालतो, जो कमाचे कर्तृत्व स्वतःकडे कधीही घेत नाही, अशा पुरुषाला खरी ज्ञानप्राप्ती होत असते. त्या ज्ञानी माणसाला अखंडपणे सुख मिळत असते. संत तुकारामांनी ज्ञानयज्ञामध्ये देहत्रयाची आहुती दिल्यानंतर त्यांची जी अवस्था होती ती ‘देहातीत ब्रह्मरूप’ अशी होती. परमेश्वराचा ज्ञानबोध झाल्यानंतर ते या परम्पदाला पोहोचले.
 
 
निरंजनी बांधियले घर |
निराकारी निरंतर राहिलो आम्ही ॥१॥
निराभासीपूण झालो समरस |
खंड ऐक्यास पावलो आम्ही ॥ध्रृ॥
तुका म्हणे आता नाही अहंकार |
जालो तदाकार नित्य शुद्ध ॥२॥ (तु. गा. ४३०३)
आपल्याला आपल्या अवतीभवतीच्या जगामध्ये पावित्र्य जोपासणार्‍या काही वस्तू पाहावयास मिळतात. त्यामध्ये १) तुळस २) फुले ३) दुर्वा ४) आदींचा समावेश होतो; परंतु या वस्तूंचे पावित्र्य चिरकाल टिकणारे नसते. ज्ञान मात्र यास वाहून वेगळे आहे. ज्ञान हे कालातीतपणे पवित्र आहे. ज्ञानाच्या पावित्र्याला दुसर्‍या कशाचीही उपमा योग्य होणार नाही. ज्ञानाइतके पवित्र फक्त ज्ञानच आहे. दुसर्‍या कोणत्याही वस्तूची तुलना ज्ञानासोबत होऊ शकत नाही. नहिज्ञानेन सदृशंपवित्र मिह विद्यते|
तत्स्वयं योग संसिद्धः निनिष वन्दति ॥२॥
(गीता- ४/३८)
संत ज्ञानेश्वरसुद्धा अनन्वय अलंकाराद्वारे ज्ञानाचे पावित्र्य पटवून देतात.
जैसी अमृताची चवी निवडिजे |
तरी अमृताचिसारखी म्हणिजे |
तैसे ज्ञान हे उपमिजे | ज्ञानेसीचि ॥३॥ (ज्ञाने. ४/१८३)
ज्याप्रमाणे अमृताची चव कशी आहे, तर ती अमृतासारखीच आहे, असे म्हणावे लागते, त्याप्रमाणे ज्ञानाला उपमा द्यायची झाल्यास ती ज्ञानाचीच द्यावी लागेल. या भूतलावर पवित्रपणाचा एकच ठेवा म्हणजे ज्ञान आहे. त्यायोगे विषयाने विटाळलेले मन शुद्ध व पवित्र होते.
 
 
अ) ज्ञान व अज्ञानाची व्याख्या
Saint Dnyaneshwar : दिव्यदृष्टी ज्यापासून प्राप्त होते व मनाला कल्पनेची बाधा ज्यामुळे होत नाही तेच खरे ज्ञान होय. वृत्तींतील भेद ज्याने व जेव्हा निघून जातात तीच ज्ञानाची प्रचीती ब्रह्मज्ञान प्राप्ती ज्याने होते तिलाच तत्त्वमसी विद्या मानावे, असे संत तुकाराम सांगतात.
रक्तश्वेत कृष्णपीत प्रभाभिन्न |
चिचन्मय अंजन सुदले डोळां ॥१॥
तेणे अंजनगुणे दिव्यदृष्टी जाली |
कल्पना निमाली द्वैताद्वैत ॥ध्रु॥
देशकाल वस्तूभेद मावळला |
आत्मा निवाळला विश्वाकार ॥२॥
न जाला प्रपंच आहे परब्रह्म |
अहंसोहंब्रह्म आकळले ॥३॥
तत्त्वम सिविद्या सांग |
तेचि जाला अंगे तुका आंता ॥४॥ (तु. गा. ४२९०)
जाणिवेचा शिरकाव जेथे होऊ शकत नाही, त्याला ज्ञान म्हणतात. प्रपंचाला व भौतिक ज्ञानाला विज्ञान मानावे. प्रपंचाला मायेमुळे मनुष्य सत्य समजतो हेच त्याचे अज्ञान आहे. संत तुकाराम अज्ञानाबाबत सांगतात -
पडिली हे रुढि जगा परचार |
चालविती वेव्हार सत्य ॥
मरणाची कांरे नाही आठवण |
संचिताचा धन लोभ हेवा ॥ध्रु॥
देहाचे भय ते काळाचे भातुके |
ग्रासूनि ते एके ठेविलेंसे ॥२॥
तुका म्हणे काहीं उघडा रे डोळे |
जाणोनि आंधळे होऊ नका ॥३॥ (तु. गा. ३४७९)
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञान, अज्ञान व विज्ञानाच्या व्याख्या ‘ज्ञानेश्वरी’मध्ये केलेल्या आहेत. मायारूपी संसार लटिका म्हणजे खोटा आहे. संसारामध्ये जे काही व्यवहार केले जातात, तेसुद्धा लटके म्हणजे खोटे आहेत; परंतु लोक त्यास सत्य समजून वागतात हे त्यांचे अज्ञान आहे. क्षेत्र म्हणजे शरीर व क्षेत्रज्ञ म्हणजे त्याला जाणणारा होय. त्यांना यर्थार्थपणे जाणण्याला संत तुकाराम ज्ञान संबोधतात.
 
 
आडवा तो उभा | असे दाटोनियां प्रभा ॥१॥
नाही एक विध | एकभाव असे शुद्ध ॥ध्रु॥
भेदाभेद आटी | नाही फार कोठे तुटी ॥२॥
तुका म्हणे गोवा | उगवा व्यवहाराचा हेवा ॥३॥
(तु. गा. २४३७)
Saint Dnyaneshwar : भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये असे सांगतात की, ज्या ज्ञानामुळे परमात्मदर्शन म्हणजेच साक्षात्कार होत असतो ते खरे ज्ञान, तर भौतिक ज्ञान म्हणजे अज्ञान मानावे.
ज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थ दर्शनम् |
एतज्ज्ञान मिती प्रोक्तम ज्ञानंयदतो न्यथा ॥
(गीता १३/११)
ज्या ज्ञानामुळे मनुष्याला आत्मसाक्षात्काराची अनुभूती येते तेच खरे ज्ञान आहे. इहलोकापासून इंद्र चंद्रादी भौतिक विज्ञानाच्या सर्व शाखांतील ज्ञानाची अज्ञानामध्ये गणना केली जाते. कारण अशा प्रकारच्या ज्ञानापासून कोणत्याही मनुष्यास आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही. संत वाङ्मयाची विचारधारा अशी की, जगातील सवभौतिक ज्ञान कितीही प्रगत असले, तरी त्यापासून फक्त निष्कर्ष काढता येईल; परंतु आत्मसाक्षात्कार मिळू शकणार नाही, त्यामुळे ते अज्ञानात मोडते.
 
संत तुकारामांनी सांगितलेला ज्ञानप्राप्तीचा उपाय
ज्ञानप्राप्तीसाठी अंतःकरणाची शुद्धता पाहिजे, अंगामध्ये नम्रता असणे आवश्यक आहे. ज्या कोणत्या गुरूकडून तुम्ही ज्ञान घेणार आहात त्याच्यावर विश्वास पाहिजे. त्यांना अनन्यभावाने शरण तुम्हाला ज्ञानप्राप्ती होणार नाही.
 
 
ते ज्ञानप्राप्ति खुण | एके पांडवा लक्षण |
अधी सद्भावे नमन | मग प्रश्न आवडीचा ॥१॥
सेवा भावाथठ्ठ करावी | निरपेक्षता असावी |
तेव्हा कृपा उपजे जीवीं | मग तो होय उपदेशु ॥२॥
शास्त्रज्ञ तत्त्वज्ञ | ज्ञान सांगती सवज्ञ |
तेव्हा सहज वमज्ञ| तुका म्हणे ॥३॥
(संत तुकारामांचे गीता अभंग ४३८)
Saint Dnyaneshwar : मनुष्यास ज्या ज्ञानामुळे आत्मसाक्षात्कार होतो ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आत्मसाक्षात्कारी, अधिकारी पुरुषाजवळ जावे. त्यांना साष्टांग नमस्काराने, विनम्रतेने साक्षात्काराविषयी प्रश्न विचारून त्यांची सेवाशुश्रूषा करावी व ते ज्ञान त्यांच्याकडून प्राप्त करून घ्यावे. पुढील श्लोकामधील पूर्वाधात भगवान श्रीकृष्णांनी ज्ञानप्राप्तीचे तीन उपाय सांगितलेले आहेत.
तद् षवद् षधप्रषणपातेनपरप्रश्नेनेसेवया
उपदेक्ष्यिंन्ततेज्ञानंज्ञाषननस्तत्त्वदषशन ॥९॥
(गीता ४/३४)
 
 
१) प्रषणपातेन - श्रीगुरूकडे ज्ञानप्राप्तीसाठी गेल्यानंतर सर्वप्रथम काय करावे, त्याबद्दल संत तुकाराम सांगतात-
श्रीसंतांष चयामाथा चरणांवरी |
साष्टांग हे करी दंडवत ॥१॥
विश्रांती पावलो सांभाळ उतरीं |
वाढलें अंतरीं प्रेमसुखें ॥ध्रु॥ (तु. गा. २१७८)
संतांकडे गेल्यानंतर सर्वप्रथम विनम्रतापूर्वक साष्टांग नमस्कार करावा. संतचरणी साष्टांग प्रणाम हा उपाय तुकारामांनी सांगितला आहे.
२) सेवा - संताकडे गेल्यानंतर त्यांची ‘सवभावे अगवतेने सेवा’ हा दुसरा उपाय ज्ञानप्राप्तीसाठी सांगितला आहे.
ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी |
तरी का षहंपुटी वेदशास्त्रे |
याजसाठी संतपाय हे सेवावे |
त रच तरावे तुका म्हणे ॥११॥ (तु. गा. २२४९)
 
 
Saint Dnyaneshwar : त्यांची सर्वभावे सेवा केल्यानंतर त्यांची प्रसन्नता त्यांच्या प्रसन्नतेत त्यांना प्रश्न करावा.
३) परप्रश्नेन - त्यांना साक्षात्कारविषयक प्रश्न विचारावेत. मी कोण, ईश्वर कोण, जगतविचार काय आहे, अशा प्रकारचे आध्यात्मिक प्रश्न विचारावेत व त्यांच्याकडून साक्षात्काराविषयी संपूर्ण ज्ञान मिळवावे.
भारतीय संस्कृतीमध्ये सांदीपनी ऋषी - श्रीकृष्ण, वसिष्ठमुनी, श्रीरामप्रभू, निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, निळोबाराय इत्यादी आदर्श गुरुशिष्य परंपरा आहे. श्रीगुरूंची मनोभावे सेवा करूनच विद्या संपादन केलेली आहे. ज्ञानसंपादनासाठी श्रद्धा, तत्परता, इंद्रियसंयम या तीन गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, असे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात.
अ) श्रद्धा-
श्रद्धा वल्लभ ते ज्ञानंतत्परः संयेतेन्दियाः |
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमषचरे नाषधगच्छति ॥१२॥
(गीता ४/३९)
ज्या व्यक्तींकडून ज्ञानप्राप्ती करून घ्यायची त्यांच्यावर अपार श्रद्धा, निष्ठा असल्याशिवाय ज्ञान नाही.
श्रद्धाळू तो ज्ञान पावे हेतु जाण |
पूर्ण समाधान जयापासी निरंतर ॥१॥
जो का इंद्रियाते आणितु हारते |
आणि ब्रह्मत्वाते तत्पर जो ॥२॥
ज्ञानास पाऊनी शांतिस घेउनी |
बैसेन गमवनी म्हणे तुका ॥३॥
(संत तुकारामांचे गीता अभंग २०१)
आ) तत्परता - सेवा करण्यासाठी तत्पर असावे लागते. ज्ञान ग्रहणासाठीसुद्धा तत्परता आवश्यक आहे. आळस न करता अत्यंत सावधानता असावी लागते. हा दुसरा उपाय आहे.
 
 
इ) इंद्रिय संयम -
साधकाची दशा उदास असावी |
उपाधी नसावी अंतबाही ॥१॥
लोलुप्यता काय निद्रेते जिणावे |
भोजन करावे परमित ॥२॥
एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण |
प्राण गेल्या जाण बोलो नये ॥३॥
तुका म्हणे साधनी जो राहे |
तोचि ज्ञान लाहे गुरुकृपा ॥४॥ (तु. गा. २७२४)
Saint Dnyaneshwar : ज्ञानप्राप्तीसाठी तिसरा महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे साधक हा इंद्रियसंयमी असणे आवश्यक आहे. विषयाच्या अधीन असणार्‍या मनुष्यास कधीही ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही आणि कदाचित झालीच तर ती त्यास पचवताही येणार नाही. आत्मज्ञान प्राप्तीसाठी साधकाने कोणते उपाय करावेत, हे संत सांगितले आहे. त्यामुळे खात्रीने ज्ञानप्राप्ती होते.-
क) स्त्रियांशी संभाषण टाळावे. ख) अल्प आहार असावा. ग) झोपेवर नियंत्रण असावे. घ) अंतर्बाह्य उपाधी डोक्यात नसावी. च) इंद्रियावर सावधानीपूर्वक विजय मिळवावा. छ) लोकांमध्ये विनाकारण बसू नये. ज) अभ्यासाचे ठिकाण आश्रम, गुहा, निसर्गरम्य असे ठिकाण असावे. झ) जास्त बोलू नये. ट) वेळेचे नियोजन ठ) गुरुकृपा प्राप्त करावी.
ज्ञानाचे प्रतिबंध जीवनकल्याणासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते ज्ञान प्राप्त होण्यामध्ये तीन अडथळे किंवा प्रतिबंध प्रामुख्याने येतात. त्यामुळे परमसाक्षात्कार होत नाही. ते तीन प्रतिबंध असे-
१) वर्तमान प्रतिबंध २) भूत प्रतिबंध ३) भावी प्रतिबंध. हे प्रतिबंध येऊ नये त्यासाठी संत तुकारामांनी साधकाची आचार संहिता सांगितली ती अशी -
निर्वाहापुरते अन्न आच्छादन |
आश्रमासी स्थान कोपी गुहा ॥१॥
कोठेही चित्तासी नसावे बंधन |
हृदयी नारायण साठवावा ॥ध्रु॥
नये बोलो फार बैसो जनामधी |
सावधान बुद्धी इंद्रियेदमी ॥२॥
तुका म्हणे घडीघडी न सांधावी |
त्रिगुणाची गोवी उगवूनी ॥३॥ (तु. गा. १४८१)
१) वर्तमानप्रतिबंध - पंचदशीकार श्रीमद्विद्यारण्यस्वामी ध्यानदीप प्रकरणामध्ये वर्तमान प्रतिबंधाबद्दल अशी व्याख्या मांडली आहे-
प्रतिबन्धो वर्तमानो विषयासक्ती लक्षणः
पज्ञामाद्यं कुतकश्चषवपययदुराग्रहः ॥४३॥
(पंचदशी-ध्यानदीप)
क) विषयासक्ती ख) बुद्धिमांद्य ग) कुतक घ) विपरीत दुराग्रह
असे विविध प्रकारचे वर्तमान प्रतिबंध आहेत.
क) विषयासक्ती - अभ्यास करताना मन सैरावैरा पंचविषयांकडे धावत असते. त्यामुळे ते एकाग्र न होता नेहमी अस्वस्थ राहते. मनामध्ये आवड हा मोठा प्रतिबंध आहे.
ख) बुद्धिमांद्य - बुद्धी तीव्रता अतिमंद असणे. बुद्धीच्या मंदपणामुळे ज्ञानाचे वेगाने ग्रहण होत नाही.
ग) कुतक - अर्थाचा अनर्थ करणे, अयोग्य विचारसरणीचा वापर करणे.
घ) विपरीत दुराग्रह - हट्टीपणामुळे स्वतःच्याच मनाने तर्कबुद्धी लावून आत्मा हाकताव भोक्ता आहे असे समजणे. एकनिष्ठा नसणे अशा प्रकारच्या प्रतिबंधामुळे ज्ञानास अडथळा होतो यामुळे ज्ञानाची निवृत्ती होत असते.
शमाद्यैःश्रवणाद्यैश्चतत्रतत्रोषचतैःक्षयम्|
नीतेऽस्मिन्प्रषतबन्धेऽतः स्वस्य ब्रह्मत्वमश्नुते ॥१६॥
(पंचदशी-ध्यानदीप ४४)
 
 
Saint Dnyaneshwar : विषयासक्ती या प्रतिबंधाचा नाश शमादी सहा साधनांनी होतो.
बुद्धिमांद्य या प्रतिबंधाचा नाश सत्शास्त्र श्रवणाने होतो. कुतकाचा मनाने नाश होतो व आत्माकता आहे, जगत सत्य आहे इ. विपरीत दुराग्रहाचा नाश निदिध्यासनाने होतो. अशा प्रकारच्या अनुष्ठान केल्यास वर्तमान प्रतिबंधांचा नाश होतो. त्यामुळे आत्माच ब्रह्म आहे, असा साक्षात्कार होतो.
२) भूतप्रतिबंध -
अतितेनापि महिषीस्नेहेन प्रतिबंधतः |
भिक्षुस्तत्त्वंन वेदेति गाथा लोकेप्रगीयते ॥१७॥
(पंचदशी-ध्यानदीप ४१)
गतकाळातील महिषीवरील प्रेमामुळे ही प्रतिबंध होतो व भिक्षूस तत्त्वज्ञान प्राप्त झाले नाही, अशी दंतकथा भूतप्रतिबंधाच्या स्पष्टीकरणात दिली आहे. तात्पर्य असे निघते की, घडलेल्या घटनांचा अभ्यासाच्या वेळी काहूर माजतो. सारख्या वेगवेगळ्या आठवणी येतात. त्यामुळे चित्त विचलित होते. याला भूत प्रतिबंध म्हणतात. साक्षात्कारासाठी साधना करणार्‍या साधकाने ध्यान करून भूत प्रतिबंध घालवावा.
३) भावी प्रतिबंध -
आगामी प्रतिबंधश्च वामदेवे सषम रतः |
एकेन जन्मनाष क्षणोभर तस्य त्रिजन्मभिः ॥९॥
(पंचदशी-ध्यानदीप ४५)
आगामी प्रतिबंध वामनदेवाच्या ठायी सांगितला आहे. तो वामनाच्या एकाच जन्मात क्षीण झाला. भरताला त्यासाठी तीन जन्म घालवावे लागले. भावी किंवा आगामी प्रतिबंधामध्ये हा पुढच्या जन्मास कारण घडणारा आहे. हा प्रतिबंध प्रारब्ध कर्माचा शेष असतो. प्रारब्ध कर्म भोगल्यावाचून संपत नाहित. आत्म साक्षात्कारासाठी हे प्रतिबंध दूर केल्याशिवाय आत्म साक्षात्कार प्राप्ती शक्य नसते.
४) ज्ञानाची महती
पावले पावले तुझे आम्हास व |
दुजा नको भाव होऊं देऊं ॥१॥
जेथे तेथे देखे तुझीच पाउलें |
त्रिभूवन संचले विठ्ठलागा ॥ध्रु॥
भेदाभेद मतें भ्रमाचे संवाद |
आम्हा नको वाद त्यांशी देऊ ॥२॥
तुका म्हणे अणु तुजविण नाही |
नभाहूनि पाहीं वाड आहे ॥३॥ (तु. गा. ३७)
कर्मामुळे किंवा मोक्षप्राप्तीचा हेतू साध्य होत नसून केवळ ज्ञानामुळेच आत्म साक्षात्काराचा हेतू सफल होऊ शकतो, असा वेदांत शास्त्रांनीही मुख्य सिद्धांत मांडलेला आहे.
 
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
७५८८५६६४००
Powered By Sangraha 9.0