दृढसंकल्प व प्रबळ इच्छाशक्तीनेच यशाेशिखर

सत्यनारायण नुवाल यांचा हिताेपदेश

    दिनांक :16-Feb-2025
Total Views |
नागपूर,
Satyanarayan Nuwal जीवनात यशाेशिखर गाठण्यासाठी दृढसंकल्प व प्रबळ इच्छाशक्ती हवी, असा हिताेपदेश देशातील अग्रणी स्फोटक निर्माते सत्यनारायण नुवाल यांनी व्यवस्थापन विद्याथ्यारना दिला. व्यवस्थापनाचे धडे देणाऱ्या देशातील नामांकित इंडियन इन्स्टिट्युट ऑफमॅनेजमेंट सभागृहात तेथील विद्यार्थ्यांसमवेत विज्ञान भारतीने संवाद आयाेजित केला हाेता. आर. रामकृष्णन यांनी सत्यनारायण नुवाल यांना बाेलते केले. आयआयएमचे संचालक भीमराया मैत्री व्यासपीठावर उपस्थित हाेते. माझे शिक्षण केवळ दहावीपयरत. परिस्थितीच अशी हाेती की शिकता आले नाही, हे सत्यनारायण नुवाल यांनी प्रांजळपणे सांगितले.
 
 Satyanarayan Nuwal
 
जीवन प्रवास सांगून ते म्हणाले की, संघर्ष भरपूर भाेगला. पण, ताे प्रत्येकाच्या आयुष्यात असताे. अशा परिस्थितीत मनाेबल कायम आणि विश्वास असेल तर जीवनात टिकाव रहाताे. स्फोटकांबद्दल थाेडीार माहिती हाेती. चंद्रपूरच्या एका मुस्लिम व्यक्तीकडे परवाना हाेता, पण ताे काहीच करत नसल्याचे समजले. त्याला जाऊन भेटलाे. Satyanarayan Nuwal गाेदामाचे १ हजार रुपये किराया त्याने मागितले. पण, त्याला परिस्थिती सांगितल्यावर एखदम न देता तीन-चार महिन्यानंतर दिले तरी चालेल, असे ताे सहृदयी म्हणाला. देव कशा व कुणाच्या रूपात मदतीला येईल, हे सांगता येत नसते. खडतर प्रवासातून आजच्या घडीला १ लाख काेटींचा व्यवसाय, ८२ देशांमध्ये कारखाने, देशातील अग्रणी स्फोटक निर्माते. देवाने अपेक्षपेक्षा जास्तच दिले.
 
देशासाठी काहीतरी केले पाहिजे, ही भावना हाेती. संरक्षण क्षेत्रात पूर्वी भारत इतर देशांवर अवलंबून हाेता. आज ही स्थिती खुप सुधारली आहे. अनेक देश आपल्यावर अवलंबून आहेत. कुटुंबाच्या सपाेर्टमुळे हे शक्य झाले, असे नुवाल म्हणाले. केवळ ज्ञानी असून चालणार नाही. दृढ इच्छाशेी, प्रबळ संकल्प हवा. पेशन्स असावा. Satyanarayan Nuwal आपले ज्ञान देश व समाजाच्या कामी यावे. जीवन सिद्धांत, जीवन मूल्ये पाळायला हवीत. संवेदनशीलता हवी, असे ते म्हणाले. प्रारंभी भीमराया मैत्री यांनी आयआयएमबद्दल माहिती दिली. नरेंद्र सातफळे यांनी विज्ञान भारतीच्या उपक्रमांबद्दल सांगितले. राघव नुवाल, डाॅ. सतीश वटे, डाॅ. यशवंत देशपांडे, प्रमाेद पडाेळे, डाॅ. राधा मुंंजे, समीर गाैतम, आशीष बडगे आदींसह अनेक गणमान्य नागरिक, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित हाेते.