वर्षभरातल्या जन्म दाखल्यांची पडताळणी होणार

19 Feb 2025 14:02:47
अमरावती, 
Birth certificates verified अवैधरीत्या वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा प्राधान्याने मांडला आहे. आतापर्यंत राज्यात सात ठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मालेगाव, मुर्तिजापूर, अकोला, अंजनगाव सुर्जी आणि आता अमरावती शहरातही गुन्ह्याची नोंद झाली आहे. गुन्हा दाखल झाला की, तपासाचे काम पोलिसांचे असते. गेल्या वर्षभरात ज्यांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज केले, त्या सर्वांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल, असा विश्वास भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला.
 

Birth certificates verified 
 
मंगळवारी अमरावती दौर्‍यावर आलेल्या सोमय्या यांनी तहसील व पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अंजनगाव सुर्जी येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हळूहळू याची व्याप्ती वाढत चालली आहे. बनावट कागदपत्र तयार करणे, जी व्यक्ती अस्तित्वात नाही, त्या व्यक्तीच्या नावे जन्म दाखले मिळवणे, असे अनेक प्रकार निदर्शनास आले आहेत. आता आमचे लक्ष्य अमरावती आहे. अमरावती शहरात ५ हजार लोकांनी जन्म दाखले मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. हे सर्व इथले असूच शकत नाहीत. ५० ते ७० वर्षे वयोगटातील लोकांचेही अर्ज आले आहेत. आतापर्यंत हे लोक काय करीत होते. Birth certificates verified अमरावती शहरात आता गुन्हा दाखल झाला आहे. अमरावती शहरातून ज्या बांगलादेशी लोकांनी जन्म प्रमाणपत्र मिळावले आहे, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. जे मी पुरावे बघितलेले आहेत, त्यानुसार ज्या ५ हजार लोकांनी अर्ज केले त्यातील निम्म्यांनी जन्म दाखले मिळवले, ते आतापर्यंत कुठे होते, असा माझा प्रश्न आहे. २०-२२ वर्षांचा तरूण जन्म दाखल्यासाठी अर्ज करतो, हे ठिक आहे. पण वयोवृद्ध लोकांचेही जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज आले आहेत, त्यामुळे मी फॉरेन्सिक ऑडिटची मागणी केली आहे. बहुतेक अमरावती शहरासाठी फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती होऊ शकते.
 
मुळात हा विषय अत्यंत किचकट आहे. Birth certificates verified पण, गेल्या दीड महिन्यात माझ्या मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पाठिंबा दिला. जन्म दाखल्यासाठी कुणी जर खोट्या दस्तावेजांचा आधार घेत असेल, तर ती व्यक्ती या ठिकाणची रहिवासी नाही, हे स्पष्ट होते. अशा लोकांच्या बचावासाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोक समोर येत आहेत. ती व्यक्ती बांगलादेशी आहे, की रोहिंग्या आहे किंवा पाकिस्तानी हे तपासातून समोर येणार आहे. सर्वात आधी तर अशा अवैधरीत्या वास्तव्य करणार्‍या लोकांना पकडणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0