नागपूर,
Dr.Hedgewar-RSS छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. हेडगेवार यांचे जीवनचरित्र वाचत असताना आपणास नेहमीच नवनवीन उर्जा असते. समाजात योग्य संदेश देण्यासाठी प्रभावी विचारांची नितांत गरज असते. सध्याच्या घडीला हिंदू समाज जागृत झाल्याचे दिसून येत आहे. Dr.Hedgewar-RSS युगप्रवर्तक-डॉक्टर हेडगेवार या नाटकाच्या माध्यमातून समाज मनावर चांगल्या संस्कारासह डॉ.हेडगेवार यांचे विचार देशविदेशात पोहोचणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी व्यक्त केला.

Dr.Hedgewar-RSS लक्ष्मी नगर येथील जगत येथे नादब्रह्य निर्मित, युगसंधान प्रस्तुत, डॉ.अजय प्रधान लिखित आणि सुबोध सुर्जीकर दिग्दर्शित युगप्रवर्तक-डॉक्टर हेडगेवार या हिंदी नाटकाच्या शुभ मुहूर्त प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय,अभिलेखागार प्रभारी रवी भुसारी, महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, माजी न्या. मिरा खडक्कार, नादब्रह्यचे अध्यक्ष पद्माकर धानोरकर, दिग्दर्शक सुर्जीकर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाव्दारे कार्यक्रमाची सुरुवता झाली. श्रीधर गाडगे यांनी मुहूर्ताचा नारळ व संहिता सुबोध सुर्जीकर यांच्याकडे सोपविली.
युगप्रवर्तक शंभर टक्के यशोशिखर गाठेल Dr.Hedgewar-RSS
युगप्रवर्तक -डॉक्टर हेडगेवार हे नाटक शंभर टक्के यशोशिखर गाठेल, असा विश्वास रवी भुसारी यांनी व्यक्त केला. येत्या १ एप्रिल रोजी रेशिमबागेतील सुरेश भट सभागृहात सायंकाळी ६.३० युगप्रवर्तक या नाटकाचा प्रयोग होणार आहे. नादब्रह्यचे अध्यक्ष पद्माकर धानोरकर हे नेहमीच अनेक चांगले प्रयोग करीत असतात. त्यामुळे हे नाटक नक्कीच देशविदेशात पोहोचणार असल्याचे रवींद्र बोकारे यांनी विश्वास व्यक्त केला. या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक अतिशय चतुर असल्याने नाटकाला खुप यश मिळेल, असे मीरा खडक्कार यांनी सांगितले.
डॉक्टर खरे युगप्रवर्तक ! Dr.Hedgewar-RSS
नाटकाचे लेखक अजय प्रधान आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, आजचा क्षण अविस्मरणीय असा आहे. अनेक स्वयंसेवक घडविण्याचे कार्य डॉ.हेडगेवार यांनी केले. त्यांच्या संस्कारामुळे देशाला योग्य दिशा मिळाली आणि अनेक स्वयंसेवक तयार झाले. खरे युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार हेच असल्याचे त्यांनी सांगितले. नादब्रह्यचे अध्यक्ष पद्माकर धानोरकर यांनी नाटकाची संकल्पना मांडली. तर पाहुण्यांचे स्वागत धानोरकर, उदय काळे, रमेशचंद्र दीक्षित, मिरा प्रधान, अजय प्रधान यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सतिश खेकाळे यांनी तर आभार उदय काळे यांनी मानले.