विशेष पाेलिस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्टृपती पुरस्कार जाहीर

यवतमाळचे माजी पाेलिस अधीक्षक, पाेलिस दलातील उत्कृष्ट कार्याची दाखल

    दिनांक :02-Feb-2025
Total Views |
यवतमाळ,
Inspector General Sanjay Darade नाशिकचे भूमिपूत्र, यवतमाळ जिल्ह्याचे माजी पाेलिस अधीक्षक आणि सध्याचे काेकण परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक संजय भास्कर दराडे यांनापाेलिस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल राष्टृपती पदक जाहीर झाले आहे. मूळ नाशिक येथील संजय भास्कर दराडे हे 2005 च्याआयपीएसच्या बॅचमधील उमेदवार आहेत. त्यांनी धाराशीव, यवतमाळ आणि नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पाेलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता त्यांचे सूक्ष्म नियाेजन वाखण्याजाेगे हाेते. त्यांचा तिन्ही ठिकाणचा कार्यकाळ अतिशय चांगला राहिला आहे. त्यांनी धाराशिवमध्ये तुळजाभवानी नवरात्री बंदाेबस्त यशस्वीपणे पार पाडला.राजकीयदृष्टया या संवेदनशील यवतमाळ जिल्ह्यात 2014 च्या विधानसभा निवडणुका, नाशिक ग्रामीणमधील आंतरराज्य टाेळीकडून 44 राय\ल, रिव्हाॅल्व्हरआणि चार हजार जिवंत काडतुसासह महाराष्टतील सवारत माेठा शस्त्रसाठा जप्त केला.नागपूर एसीबीचे एसपी या नात्याने भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये सापळे आणि संवेदनशील चाैकशीची नाेंद केली आहे. तर 2015 मध्ये नाशिक कुंभमेळा बंदाेबस्त यशस्वी रीत्या पूर्ण केला. त्याबद्दल महाराष्टच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना काैतुक पत्र दिले आहे. त्यांनी पूर्व विभागाचे अतिरिेक्त पाेलिस आयुक्त म्हणून जातीयदृष्ट्या संवेदनशील पूर्व मुंबईत प्रभावीपणे काम केले. तर 2024 ची लाेकसभा निवडणूकत्यांनी काेकण परिक्षेत्रात यशस्वीपणे हाताळली आहे.त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची पावती म्हणून त्यांना राष्टृपती पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल संपूर्ण पाेलिस दलातून त्यांच्यावर काैतुकाचा वर्षाव हाेताे आहे.
 
 
२ ३ ४ ५
 
 या पुरस्कारामागे अनेकांची साथ मला जाहीर झालेलाInspector General Sanjay Darade हा पुरस्कार सुरुवातीपासून प्रत्येक प्रयत्नासाठी आत्मविश्वास देणारे आईवडील, वेळाेवेळी मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक,पाेलिस दलातील सर्व वरिष्ठ प्रत्येक ठिकाणी कामात माेलाची साथ देणारे सहकारी आणि मी कर्तव्यावर सर्व जबाबदारी पार पाडत असतानाप्रत्येकवेळी हिंमत देणारी पत्नी राेहिणी व मुली सारा आणि मीरा या सवारची साथ मिळाल्यानेच मी या पुरस्काराचा मानकरी हाेऊ शकलाे.अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.