"महाराष्ट्र केसरी" कुस्ती स्पर्धेला गालबोट

    दिनांक :02-Feb-2025
Total Views |
Maharashtra Kesari 2025 अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.परंतु, या स्पर्धेला गालबोट लागला आहे. २९ जानेवारीला सुरु झालेल्या या स्पर्धेमध्ये साडेआठशे मल्लांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी पटकवणाऱ्याला थार देण्यात येणार आहे. तर उपविजेत्याला बलेरो आणि इतर विजेत्यांना १९ बुलेट, १९ स्प्लेडर, १८ अर्ध्या ग्रामची सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. आज होणाऱ्या मातीच्या कुस्तीत महेंद्र गायकवाड सोलापूर याच्याविरुद्ध संकेत यादव परभणी यांच्यामध्ये ही लढत होणार आहे तर गादीच्या अंतिम लढतीत पृथ्वीराज मोहोळ पुणे विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यामध्ये ही लढत होणार आहे हे चारही मल्ल महाराष्ट्र मध्ये नावाजलेले असून, कोण बाजी मारणार याकडे कुस्तीप्रेमींचं लक्ष लागून आहे.
 

kesari 
 
 
 
पृथ्वीराज मोहोळकडून Maharashtra Kesari 2025 पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचाना लाथ मारली आणि स्पर्धेच्या ठिकाणी एकच गोंधळ झाला. पंचांचा निर्णय मान्य न झाल्याने शिवराज राक्षेने हे कृत्य केलं. यावेळी, दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचं दिसून आलं. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले.
 
महाराष्ट्र Maharashtra Kesari 2025 केसरी 2025 ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण शिवराज राक्षेला त्याचा पराभव मान्य झाला नव्हता. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. नंतर राग अनावर झाल्यानंतर त्यांने पंचांची कॉलर खेचली आणि लाथही मारल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं. मात्र, “माझी पाठ टेकली नव्हती,” असे स्पष्ट करत शिवराज राक्षेने आरोप फेटाळले आहेत. आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
माती विभागातील अंतिम सामना :
महेंद्र गायकवाड Maharashtra Kesari 2025 (सोलापूर) विरुद्ध साकेत यादव (परभणी)
महेंद्र गायकवाड हा उप-महाराष्ट्र केसरी राहिला असून, त्याची ताकद आणि आक्रमकता त्याला प्रबळ दावेदार आहे. तर, साकेत यादवनंही प्रभावी खेळ करत अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळं हा सामना प्रेक्षणीय ठरणार आहे.