नागपूर,
khasdar krida mahotsav 2025 खासदार क्रीडा महोत्सव शहरासह संपूर्ण विदर्भातील खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ ठरले. मागील २० दिवसांपासून सुरू असलेल्या महोत्सवाचा रविवारी २ फेब्रुवारी २०२५ रोजी समारोप होत आहे. यशवंत स्टेडियम येथे सायंकाळी ५.३० वाजता सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला सुरुवात होईल. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असेल. अध्यक्षस्थानी खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतील. अतिथी म्हणून राज्याचे मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. विशेष म्हणजे, दोन्ही हात नसतानाही पॅरालिम्पिक तिरंदाजी स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावून सर्वात तरुण भारतीय पॅरालिम्पिक पदक विजेती ठरलेली शीतल देवी या कार्यक्रमाला विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय, सुप्रसिद्ध khasdar krida mahotsav 2025 सनम बँडच्या लाईव्ह इन कॉन्सर्टचे समारोपीय कार्यक्रमाला आयोजन करण्यात आले आहे. खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.यावेळी, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, सुधीर दिवे, महोत्सवाचे सहसंयोजक डॉ.पद्माकर चारमोडे, नागेश सहारे, अशफाक शेख उपस्थित होते. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट क्रीडा संघटक,तसेच क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यंदा सुनील रायसोनी यांना उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्काराने व मराठा लॉन्सर्स आणि भारत व्यायाम शाळा यांना उत्कृष्ट क्रीडा संघटनांना विभागून पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तिरंदाजी स्पर्धेचे प्रशिक्षक मोहम्मद झिशान, बॅडमिंटन प्रशिक्षक किरण माकोडे आणि दिव्यांग क्रीडा स्पर्धांमधून अनेक खेळाडूंना नवी दिशा विनय उपासनी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. प्रत्येकी ५१ हजार रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करून उत्कृष्ट क्रीडा संघटक आणि उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात येईल. यावर्षी, विविध खेळांच्या २९ खेळाडूंची क्रीडा भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. या खेळाडूंना प्रत्येकी ३१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान सन्मानित करण्यात येईल, असेही संदीप जोशी यांनी सांगितले.
खासदार महोत्सव-७चे क्रीडा भूषण पुरस्कार विजेते
सुनील भास्कर khasdar krida mahotsav 2025 पांडे (आट्या-पाट्या), हर्षल चुटे (योगा), सिया देवधर (बास्केटबॉल), प्रांजल खोब्रागडे (कुस्ती), रोहन रवि गुरबानी (बॅडमिंटन), मनिषा रायसिंग मडावी (खो-खो), नेहा विशाल ढबाले (अॅथलेटिक्स), मिताली भोयर (मॅरेथॉन), मृणाली पांडे (दिव्यांग ) (ब्लाइंड बुद्धीबळ)), प्रतिक (टेबल टेनिस (एम.आर)), निधी तरारे (मुकबधिर (अॅथलेटिक्स)), हेरंभ पोहाणे (लॉन टेनिस), साईप्रसाद काळे (ज्युदो), हिमानी गावंडे (हॉकी), अनन्या लोकेश नायडू (रायफल शुटींग), क्षितीजा सावरकर (कबड्डी), रहनुमा सरवर आलमशेख (सॉफ्टबॉल), दिग्विजय शरद आदमने (स्वीमींग), नील हिंगे (धनुर्विद्या), समक्षा प्रदीप सिंग (बॉक्सींग), विवान सारोगी (बुद्धीबळ), ईशान प्रशांत काळबांडे कस्तुरी ताम्हनकर (स्केटिंग), शुक्ला (फुटबॉल), ओम मारशेट्टीवार (तायक्वांदो), शहनवाज खान (सेपक टॅकरा), स्नेहल जोशी (ट्रायथोलॉन), रूतीका अरायकर (कराटे), निखिल लोखंडे (कॅरम) हे खासदार महोत्सव-७चे क्रीडा भूषण पुरस्कार विजेते आहेत.