तरुणाने साकारले महाराजांचे अतिशय सूक्ष्म चित्र!

नागपूर शहरातील विक्रम..

    दिनांक :21-Feb-2025
Total Views |
नागपूर,
Chhatrapati Shivaji Maharaj राज्यात सगळीकडे शिवजयंतीचा उत्साह होता. सगळीकडील वातावरण भगवे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्ये ही प्रत्येकांनी आदर्श घ्यावीत अशीच आहेत.तसा आदर्श तरुणाई आजच्या पिढीत ठेवत आहे आणि स्वपरीने महाराजाना नमन करत आहे. अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची १९ फेब्रुवारी रोजी जयंती पार पडली. रयतेच्या सुखासाठी शिवाजी महाराजांनी जिवाचे रान केले. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली.नागपुरात वातावरण आनंदमयी झाले. पण अशातच एक तरुणाने आपल्या शांत कृतीने महाराजांना अनोखी भेट दिली, ज्याची चर्चा आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये होत आहे. चला पाहूया काय आहे नेमके?
 
 
Chhatrapati Shivaji Maharaj
 
 
धाग्यांचा वापर करून...
पराक्रमी आणि बेधडकपणे लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नागपूर शहरात चित्र तयार करण्यात आले असून, हे संपूर्ण भारतातील सर्वात लहान चित्र आहे. नागपूरच्या व्हीएनआयटी आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग विभागातील विद्यार्थी शशांक सचिन बसुदे याने आपल्या कौशल्याने आणि सर्जनशीलतेने एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने सुकलेल्या जाळीदार पीपळाच्या पानावर अवघ्या 3.5 सेमी x 4 सेमी आकाराचे छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय सूक्ष्म चित्र तयार करून 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये आपले नाव नोंदवले आहे.शशांक हा नेहमीच अभिनव प्रयोगशीलतेचा ध्यास घेत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने प्रेरित होत, त्याने अनेक वेगवेगळ्या माध्यमांमध्ये कलाकृती निर्माण केल्या आहेत. मातीच्या शिल्पांपासून ते धाग्यांच्या कलाकृतीपर्यंत, त्याने विविध पद्धतींनी महाराजांना आदरांजली वाहिली आहे. विशेष म्हणजे, त्याने ६.४ किलोमीटर धाग्यांचा वापर करून तब्बल २.४ मीटर उंचीचे शिवाजी महाराजांचे धाग्यांचे चित्र तयार केले आहे.
शशांकची ही कला केवळ त्याच्या निपुणतेचे नव्हे, तर त्याच्या मेहनतीचे, समर्पणाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेल्या अपार श्रद्धेचे प्रतीक आहे. या अनोख्या विक्रमाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.