नागपूर ,
Rahate Colony Nagpur शहर सुंदर होतयं पण ? एखाद्या सुंदर चेहऱ्यावर जसे सतत मुरुम येऊन जातात. डाग आणि खड्डे पडतात. काही केल्या ते जातच नाही,असा काहीसा प्रकार आपल्या शहरात सतत दिसून येतो आहे.रस्ता सुंदर होतो. पण लागलीच खड्डे तयार होतात आणि ते जातच नाही .आणि अपघाताला आमंत्रण देतात.याप्रकाराने अपघात घडतात. नागरिकांची गैरसोय होते. मुलं शाळेत उशिरा पोचतात. अशा अनेक अडचणी येत आहे. प्रशासनाला वांरवार निवेदनं दिली जातात. पण ?
रहाटे कॉलनी ते दीक्षाभूमी या दरम्यान रस्त्यावरती, अंध विद्यालयाच्या गेट समोर गेल्या आठवड्या पासून रस्ता खोदून ठेवलेला आहे. हा रस्ता अरुंद झाल्यामुळे शुक्रवारला दोन कारमध्ये तिथे टक्कर झाली. Rahate Colony Nagpur हा खड्डा अपघाताला आमंत्रण देत आहे आणि सध्या ते काम बंद आहे. दहावी बारावीचे पेपर असल्यामुळे या रस्त्यावरती भरपूर गर्दी असते, तरी हे काम लवकरात लवकर करण्यात यावे. अन्यथा इथे मोठा अपघात होऊ शकतो.याची दखल घेण्यात यावी.
सौजन्य:सुरेश चवरे,संपर्क मित्र