वशिष्ठ ऋषींनी एक कोटी आहुती यज्ञ केल्याने ’कोटेश्वर’

    दिनांक :25-Feb-2025
Total Views |
अविनाश भोपे,
पुलगाव, 
Koteshwar Temple-Deoli : कोटेश्‍वर देवस्थान देवळी तालुक्यात प्राचीन हेमाडपंती शिवमंदिर आहे. हे मंदिर वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पश्चिम तीरावर आहे. काशीखंड शिवपुराणामध्ये या शिवमंदिराची महती दिली आहे. या मंदिराला काशी म्हणून ओळखले जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.
 

JKJ 
 
प्रभू रामाचे गुरू वशिष्ठ ऋषींनी या ठिकाणी एक कोटी आहुती यज्ञ केल्याने ’कोटेश्वर’ असे या शिवलिंगाला नामाभिदान प्राप्त झाले. मंदिरालगतच उत्तर वाहिनी वर्धा नदी मंदिराला प्रदशिणा घालत वाहते. मंदिर वनराईने वेढलेल्या टेकडीवर आहे. येथे तीरावर वर्धा नदीच्या पूर्वेला प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे. एक योगी पुरुष मारुती महाराजांच्या समाधीसह हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात दिमाखाने उभे आहे. वर्धा नदीच्या पाण्यामध्ये बेलाचे पान सोडले असता ते पाण्यात न तरंगता खाली जाते. या ठिकाणी झालेल्या कोटी यज्ञामुळे अजूनही या परिसरामध्ये खोदकाम केले असता यज्ञाची राख निघते. या मंदिराच्या कळसावर गेलेल्या कडुलिंबाच्या झाडाची पाने गोड लागतात. येथील मंदिरामध्ये दर्शनासाठी विदर्भाच्या कानाकोपर्‍यातून भक्त येतात.