नमाे शेतकरी याेजनेत ३ हजारांची वाढ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा

    दिनांक :25-Feb-2025
Total Views |
वर्षाला मिळणार आता १५ हजार
नागपूर,
Namo Shiksha Yojana प्रधानमंत्री शेतकरी सन्मान याेजतेतंर्गत शेतकऱ्यांना ६ हजार मिळतात. याच धर्तीवर राज्य शासनाने नमाे शेतकरी महासन्मान याेजना सुरू केली आहे. यात आणखी ३ हजारांची लवकरच वाढ केली जाणार असून, वर्षात शेतकऱ्यांना आता दाेन्ही याेजनेचे १५ हजार रुपये लवकरच मिळतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधीचा १९ वा हप्ता वितरण समारंभ बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. हाच राज्यस्तरीय कार्यक्रम वनामती येथे पार पडला.
 
Namo Shiksha Yojana
 
त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बाेलत हाेते. कार्यक्रमाला कृषी राज्यमंत्री अ‍ॅड. आशीश जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्ताेगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, प्रभारी विभागीय आयुक्त डाॅ. माधवी खाेडे, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, आनंदराव राउत प्रामुख्याने उपस्थित हाेते.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वनामती येथे कृषी प्रदर्शनीचे उदघाटन व उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. Namo Shiksha Yojana मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, २०१४ साली मुख्यमंत्री झाल्यानंतर जलयुक्त शिवार, बळीराजा कृषी सिंचन याेजना, प्रधानमंत्री सिंचन याेजना राबवून २५ हजार काेटी रुपये रखडलेल्या प्रकल्पावर खर्च केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी याेजनेतंर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे दिली. शेततळ्यावर ४ हजार काेटी खर्च केले. आता 6 हजार काेटी रुपये खर्च करणार आहे. आता शेतकऱ्यांसाठी अ‍ॅग्रीस्टॅक ही नवीन याेजना सुरू केली आहे. आतापयरत ५४ टक्के शेतकरी याेजनेशी जाेडले असून, ५६ टक्के शेतकऱ्यांना जाेडायचे आहे. कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध याेजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता ही याेजना सुरू केली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
५५० किमींची नवीन नदी तयार करणार गाेसीखुर्द धरणाच्या खालून १०० टीएमसी पाणी वाहून समुद्राला जाते. त्यामुळे या वाहून जाणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी वापर केला जाणार आहे. Namo Shiksha Yojana त्यासाठी ५५० किमीची नवीन नदी तयार केली जात आहे. विदर्भातील सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी वैनगंगा-नळगंगा नदी जाेड प्रकल्प येत्या सात वर्षात मार्गी लावणार आहे. परंतु या प्रकल्पाचा लाभ काही जिल्ह्यांना ३ वषारपासून हाेणार आहे. हा प्रकल्प ८८ हजार काेटींच्या असून १० लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे, असे ते म्हणाले.