आपली बस शहराबाहेरही धावणार

26 Feb 2025 21:49:13
नागपूर, 
Nagpur-aapli bus : महानगरपालिकेच्या परिवहन विभागाद्वारे नव्याने बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. या बसेस विविध मार्गांवर धावणार आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. फेऱ्यांचे वेळापत्रक मनपाच्या परिवहन विभागाने जारी केले आहे.
 
 
jnjk
 
 
 
मोरभवन ते तितूर रेल्वे स्टेशन (कुचाडी, तितूर, चितापूर )या दरम्यान सकाळी 6.00, 10.45 व दुपारी 1.05 वाजता बसेस सुटणार आहेत. तितूर रेल्वे स्टेशन ते मोरभवनदरम्यान सकाळी 7.40, 12.25, 2.40 वाजता बसेस सुटणार आहेत. मोरभवन ते मंगरूळ (डोंगरगाव मार्गे) सकाळी 9.15, 16.45 वाजता बसेस सुटणार आहेत. मंगरूळ ते मोरभवनदरम्यान सकाळी 10.20 आणि सायंकाळी 6.00 वाजता बसेस सुटणार आहेत. मोरभवन ते वडेगाव काळे (पाचगाव मार्गे) दरम्यान सकाळी 5.15, 7.45, 10.30 वाजता व दुपारी 4.00 वाजता बसेस सुटणार आहेत. वडेगाव काळे ते मोरभवन या दरम्यान सकाळी 6.15, 9.15 वाजता, दुपारी 12.00 आणि सायंकाळी 5.30वाजता बसेस सुटणार आहेत.
 
 
मोरभवन ते खाव (फेटरी, चिंचोली मार्गे) दरम्यान सकाळी 6.30, 7.30, 8.30, 9.30, 10.50, 11.50, दुपारी 2.30, 3.30, 4.30, 5.50, 6.50, 7.50 वाजता बसेस सुटणार आहेत. खाव ते मोरभवन या दरम्यान सकाळी 7.30, 8.30, 9.30, 10.30, 11.50, दुपारी 12.50, 3.30, 4.30, 5.30, 6.50, 7.50 आणि 10.50 वाजता बसेस सुटणार आहेत. मोरभवन ते नितनवरे लॉन (दाते ले-आऊट) दरम्यान दुपारी 12 आणि सायंकाळी 6 वाजता बसेस सुटणार आहेत. नितनवरे लॉन ते मोरभवन या दरम्यान सकाळी 7.00 वाजता, दुपारी 12.40 आणि सायंकाळी 6.40वाजता बसेस सुटणार आहेत.
Powered By Sangraha 9.0