काळेंचे विधानसभा प्रेम; खासदार निधीचा आर्वीतच वर्षाव

नालवाडी ठरले अपवाद

    दिनांक :27-Feb-2025
Total Views |
वर्धा,
Wardha Lok Sabha Constituency वर्धा लोकसभा मतदार संघात मे महिन्यात चमत्कार झाला. आर्वीचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. वर्धा लोकसभा मतदार संघात राकाँ शरद पवार गटाकडून ते लढले आणि विजयी झाले. वर्धा लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा मतदार संघ आहेत. परंतु, खा. काळे यांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून नालवाडी ग्रापंचा अपवाद सोडता आर्वी विधानसभा मतदार संघातच 5 कोटी रुपयांचा निधी देण्यासाठीचे पत्र दिले आहे.
 
 
Wardha Lok Sabha Constituency
 
खासदार अमर काळे यांनी आपल्या स्वाक्षरीने 17 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात खासदार स्थानिक विकास निधी सन 2024-25 अंतर्गत कामाला प्रशासकीय निधीची मान्यता प्रदान करण्यासाठीचे पत्र दिले. त्यात वर्धा विधानसभा मतदार संघातील नालवाडी येथे सिमेंट रस्त्याच्या बांधकामाकरिता 5 लाखाच्या निधीचे नियोजन केले आहे. Wardha Lok Sabha Constituency उर्वरित आर्वी तालुक्यातील आर्वी, नांदपूर, शिरपूर, काचनुर, हिवरा, दहेगाव (गोंडी), कासारखेडा. दहेगाव (मुस्तङ्गा), आष्टी तालुक्यातील आष्टी, नवीन आष्टी, तारासावंगा, वडाळा, माणिकवाडा, भारसवाडा, वाघोली, टेकोडा, तळेगाव (श्या.पंत) तर कारंजा घाडगे तालुक्यातील रहाटी, सेलगाव (लवने), चिचोली, किन्हाळा, माळेगाव काळी, पिपरी, बोटोणा, एकार्जुन, नारा, वाघोडा, बिहाडी, तरोडा, सुसुंद्रा या गावांना देण्यात येणार्‍या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात यावे, असा उल्लेख केला आहे.
 
वर्धा लोकसभा मतदार संघात वर्धा जिल्ह्यातील आर्वी, वर्धा, देवळी आणि हिंगणघाट तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, धामणगाव हे दोन असे सहा मतदार संघ आहेत. Wardha Lok Sabha Constituency खा. काळे यांना हिंगणघाट विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. परंतु, खा. अमर काळे यांनी आपल्या गृह मतदार संघातच निधीचा वर्षाव केला आहे.