दिल्लीकरांवर बरसात आणि खैरात!

Delhi-election-BJP-AAP आप सरकारची चाैकशी

    दिनांक :03-Feb-2025
Total Views |
दिल्ली दिनांक 
 
 
- रवींद्र दाणी
Delhi-election-BJP-AAP केवळ 48 तासांनी दिल्ली विधानसभा निवडण्यासाठी मतदान सुरू हाेईल. काय आहे या निवडणुकीचे चित्र? ‘सारे काही माेफत!’ प्रगत देशांमध्ये माेफत काहीच नाही, प्रत्येक सेवेसाठी शुल्क हे धाेरण असताना दिल्लीत मात्र ‘सारे काही माेफत’ हाेणार असल्याचे चित्र विधानसभा प्रचारात तयार झाले आहे आणि दिल्लीपुरता विचार केल्यास हा चुकीचा पायंडा सुरू केला आहे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी. समाजाच्या काही घटकांना नि:शुल्क वीज, पाणी, शिक्षण या साेयी देत सत्तेवर आलेल्या केजरीवाल यांनी या निवडणुकीत दिल्लीकरांना आणखी काही माेफत देण्याची घाेषणा केली आहे. स्वाभाविकच भाजपा व काँग्रेस यांनाही तशा घाेषणा कराव्या लागल्या आहेत.
 
 
 
Delhi-election-BJP-AAP
 
Delhi-election-BJP-AAP आपच्या घाेषणा : केजरीवाल सत्तेवर आल्यापासून त्यांनी समाजाच्या दुर्बल घटकांना माे\त वीज व पाणी देण्याची घाेषणा केली व ती लागू केली. मात्र, ही याेजना फक्त घरमालकांसाठी हाेती. आता ती भाडेकऱ्यांनाही लागू करण्याचा निर्णय केजरीवाल यांनी घाेषित केला आहे. नि:शुल्क वैद्यकीय साेयी पुरविण्याची याेजना केजरीवाल यांनी यापूर्वीच लागू केली आहे. या याेजनेनुसार दुर्बल घटकांना नि:शुल्क उपचारासाठी सरकारी रुग्णालयात जाण्याची गरज नसते. ते काेणत्याही खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार, वैद्यकीय चाचण्या करवून घेऊ शकतात आणि हा खर्च दिल्ली सरकारकडून त्यांना परत केला जाताे. ही याेजना जनतेत लाेकप्रिय ठरली आहे.
 
 
Delhi-election-BJP-AAP महिलांना 2100 रुपये : मध्यप्रदेशात शिवराजसिंह चाैहान सरकारने सुरू केलेली ‘लाडली बहन याेजना’ वेगवेगळ्या नावांनी साऱ्या देशात सुरू हाेत असल्याचे दिसत आहे. दिल्लीत प्रचार सुरू हाेताच सर्वप्रथम आम आदमी पक्षाने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घाेषणा केली. ‘संजीवनी’ या नावाने सुरू केल्या जाणाऱ्या या याेजनेत गरीब घटकांतील महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घाेषणा करण्यात आली आहे.
Delhi-election-BJP-AAP ऑटाेचालकांवर मेहेरेबानी : डाॅ. बाबासहेब आंबडेकर यांच्या नावाने दलित विद्यार्थ्यांसाठी एक शिष्यवृत्ती सुरू करण्याचीही घाेषणा आपच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. दिल्लीतील ऑटाेरिक्षा चालकांनी केजरीवाल यांना पाठिंबा दिला हाेता. त्या बदल्यात दिल्ली सरकारने ऑटाेरिक्षा चालकांसाठी यापूर्वीच काही साेयी घाेषित केल्या हाेत्या. आता त्यात आणखी भर पडली आहे. ऑटाेरिक्षा चालकांना 10 लाखांचा विमा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 5 लाखांचा अपघात विमाही काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शिवाय ऑटाेरिक्षा चालकांना त्याच्या मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपये देण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
 
 
Delhi-election-BJP-AAP 2100 विरुद्ध 2500 : आम आदमी पक्षाने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घाेषणा केल्यानंतर भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात महिला समृद्धी याेजना घाेषित केली असून या याेजनेनुसार महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महिलांना 500 रुपये दराने गॅस सिलेंडर देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. हाेळी आणि दिवाळी या सणांना दाेन सिलेंडर नि:शुल्क देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. ‘आयुष्मान भारत’ याेजनेंतर्गत 50 लाख दिल्लीवासीयांना आराेग्य साेयी पुरविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सेवानिवृत्ती याेजना सुरू करण्याचे वचनही भाजपाच्या संकल्पपत्रात देण्यात आले असून सेवानिवृत्ती वेतनाची राशी 2500 वरून वाढवून ती 3000 करण्याचे नमूद करण्यात आले आहे.
 
 
 
Delhi-election-BJP-AAP पाच रुपयात जेवण! : केवळ पाच रुपयात चांगले जेवण पुरविण्याची घाेषणा भाजपाच्या संकल्पपत्रात करण्यात आली असून ‘अटल कँटिन’ या नावाने ही याेजना राबविण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. याशिवाय दलित विद्यार्थ्यांसाठी डाॅ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या नावाने एक याेजना सुरू करण्याचे आश्वासन संकल्पपत्रात देण्यात आले आहे. समाजाच्या दुर्बल घटकांतील मुलांना नि:शुल्क शिक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. केजी ते पीजी म्हणजे पदव्युत्तर शिक्षणापर्यंंत सारे शिक्षण नि:शुल्क देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात नमूद न केलेली पण प्रचारात आणलेली एक बाब म्हणजे नायब राज्यपालांशी चांगले संबंध असलेल्या पक्षाला मतदारांनी संधी द्यावी, असे पक्षाकडून म्हटले जात आहे. याचाही परिणाम मतदारांवर हाेऊ शकताे. आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास पुन्हा नायब राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा संघर्ष सुरू हाेईल व त्यात सारे प्रशासन ठप्प हाेईल, असा विचार मतदार करू शकतात. भाजपासाठी हा मुद्दा जमेचा ठरू शकताे.
 
 
 
Delhi-election-BJP-AAP आप सरकारची चाैकशी : केजरीवाल यांच्या सरकारने मागील 10 वर्षांत घेतलेल्या सर्व चुकीच्या निर्णयांची चाैकशी करण्याचे आश्वासन भाजपाच्या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. भाजपाने आपला जाहीरनामा ‘संकल्पपत्र’ या नावाने जारी केला असून ताे तीन भागांत जारी करण्यात आला.
Delhi-election-BJP-AAP प्यारी दीदी याेजना : ‘लाडली बहन’ या याेजनेची नक्कल करीत काँग्रेसने ‘प्यारी दीदी याेजना’ राबविण्याचे आश्वासन दिले आहे. या याेजनेत महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. याशिवाय महिलांना 500 रुपयात गॅस सिलेंडर देण्याचेही आश्वासन दिले असून हाेळी व दिवाळी या दाेन सणांना प्रत्येकी एक गॅस सिलेंडरही दिले जाईल, असे पक्षाने म्हटले आहे. याशिवाय गरीब घटकाला दरमहा 300 युनिट वीज माे\त देण्याचे पक्षाचे धाेरण असल्याचे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे. दिल्लीतील सर्व नागरिकांना 25 लाख रुपयांचा आराेग्य विमा देण्याची बाब घाेषणापत्रात नमूद करण्यात आली आहे. शिक्षित पण राेजगार नसलेल्या युवकांना दरमहा 8500 रुपये देण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
Delhi-election-BJP-AAP अर्थसंकल्पाचा परिणाम : 1 फेब्रुवारी राेजी लाेकसभेत सादर झालेल्या अर्थसंकल्पाचा कितपत परिणाम दिल्ली निवडणुकीवर हाेईल, असाही एक प्रश्न विचारला जात आहे. केंद्र सरकारने देशासाठी केलेल्या घाेषणांचा परिणाम निश्चितपणे दिल्ली विधानसभा निवडणुकीवर दिसून येईल.
 
 
 
Delhi-election-BJP-AAP आकर्षक जाहीरनामे : आम आदमी पक्ष, काँग्रेस व भाजपा तिन्ही पक्षांनी आकर्षक जाहीरनामे जारी केले आहेत. मात्र भारतात आजवर तरी जाहीरनाम्यांच्या आधारे मतदान हाेत असल्याचा इतिहास नाही. या निवडणुकीत आप, भाजपा व काँग्रेस हे तीन मुख्य पक्ष रिंगणात असले, तरी खरी लढत आम आदमी पक्ष व भाजपा यांच्यातच हाेणार आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदार एकतर एखाद्या पक्षाला विजयी करण्यासाठी मतदान करताे वा मग एखादा पक्षाला पराभूत करण्यासाठी मतदान करताे. एकतर ताे आम आदमी पक्षाला विजयी करण्यासाठी मतदान करील वा मग या पक्षाला पराभूत करण्यासाठी मतदान करील. ‘आप’ला भाजपा पराभूत करू शकते; काँग्रेस नाही, हेही त्याला ठावूक आहे. त्यामुळे ही लढत आम आदमी पक्ष व भाजपा यांच्यात हाेणार हे ठरलेले आहे. काँग्रेस पक्ष काही मतदारसंघात चांगली लढत देऊ शकताे. मात्र किती जागा पक्षाला मिळतील यावर साशंकता आहे. काँग्रेस दुहेरी आकडा गाठू शकण्याची शक्यता फार
च कमी असल्याचे मानले जाते.
Delhi-election-BJP-AAP एकतर्फी नाही : 2015 व 2020 च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला एकर्ती काैल मिळाला हाेता. यावेळी ताे मिळणार नाही हे निश्चित. फार कमी जागांच्या \रकाने दिल्ली विधानसभेचा निकाल लागेल.