- ‘पीएमआय’ सहा महिन्यांच्या उच्चांकावर
नवी दिल्ली,
'HSBC India' survey : देशातील उत्पादन क्षेत्राच्या सक्रियतेचा वेग सरलेल्या जानेवारी महिन्यात मागील सहा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेल्याचे ‘एचएसबीसी इंडिया’च्या मासिक सर्वेक्षणातून पुढे आले. कंपन्यांच्या निर्यात कार्यादेशांमध्ये गेल्या वर्षांतील सर्वाधिक वाढ झाल्याचेही आकडेवारीत नमूद आहे. उत्पादन क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक जानेवारीमध्ये ५७.७ वर पोहोचला आहे.
'HSBC India' survey : देशातील निर्मिती क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेणार्या ‘एचएसबीसी इंडिया’च्या सर्वेक्षणावर आधारित पीएमआय निर्देशांकाची जानेवारीमधील ५७.७ गुणांची पातळी ही देशाच्या कारखानदारीची गती महिनागणिक वाढल्याचे द्योतक आहे. निर्देशांकात झालेली वाढ गेल्या सहा महिन्यांतील उच्चांक आहे. आधीच्या महिन्यात या क्षेत्राचा निर्देशांक ५६.४ होता. ‘एचएसबीसी इंडिया’च्या सर्वेक्षणानुसार निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांच्या देशांतर्गत नवीन कार्यादेशांमध्ये लक्षणीय वाढ नोंदविली असून, त्यांच्या आंतरराष्ट्रीय विक्रीतही वाढ झाली आहे. मागणीत झालेल्या वाढीमुळे कंपन्यांकडून उत्पादन क्षमता वाढविण्यात येत आहे.
कर्मचार्यांच्या भरतीत वाढ
'HSBC India' survey : उत्पादन निर्मिती क्षेत्रातील देशांतर्गत ३२ टक्के कंपन्यांच्या उत्पादनात वाढ, तर १ कंपन्यांच्या उत्पादनात घसरणीचा अंदाज सर्वेक्षणात वर्तविला आहे. वाढलेल्या मागणीमुळे अनेक कंपन्यांनी मनुष्यबळातही वाढ केल्याचे सर्वेक्षणात नमूद आहे. भारताच्या निर्मिती क्षेत्राने जानेवारीमध्ये सहा महिन्यांतील उच्चांकी कामगिरी नोंदविली. देशांतर्गत आणि निर्यातीच्या कार्यादेशात वाढ झाली असून, नवीन कार्यादेशातील वाढीला लक्षणीय गती मिळाल्याचे दिसत असल्याचे एचएसबीसीचे मुख्य अर्थतज्ज्ञ प्रांजुल भंडारी यांनी म्हटले आहे.