पाेलिसांचे लहानशे गाव झाले रीकामे

-लाेहमार्ग पाेलिस किरायाच्या घरात -कधी मिळेल हक्काचे घर? -अजनीतील क्वाॅर्टर झाले जिर्ण

    दिनांक :04-Feb-2025
Total Views |
-दाेन वर्षांपासून प्रस्ताव धुळखात
शैलेश भाेयर
नागपूर,
Ajni Police Quarter : पाेलिस क्वाॅर्टर म्हणजे एखादे लहानसे गाव म्हणता येईल. या छाेट्याशा गावात जवळपास ७०० लाेक राहायचे. त्यांना एकमेकांचा आधार हाेता. एकमेकांच्या सुख दुःखात ते सहभागी व्हायचे. विचारांची आदान प्रदान व्हायची. बरेचदा गुन्ह्याचा छडा लावण्याच्या दृष्टीनेही चर्चा व्हायच्या. विशेष म्हणजे सुरक्षेचे भक्कम कवच हाेते. आता पाेलिसांचे लहानसे गावच रिकामे झाल्याने नाते दुरावले, विचारांची आदान प्रदानही संपली. आता १६८ कुटुंब वेगवेगळ्या ठिकाणी किरायाने राहात आहेत. ज्यांना घर आहे त्यांचे ठिक परंतु जे किरायाच्या घरात राहतात, त्यांच्या बऱ्याच अडचणी आहेत.

Ajni Police Quarter
 
लाेहमार्ग पाेलिस मुख्यालयात (अजनी) १६८ क्वाॅर्टर हाेते. एका क्वाॅर्टरमध्ये पती पत्नी आणि मुले मिळून चार जणांचे कुटुंब तरी राहात हाेते. त्या अर्थाने जवळपास ७०० लाेक याठिकाणी राहायाचे. जीर्ण झाल्यामुळे सर्वांना क्वाॅर्टर रिकामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आणि पाहता पाहता एक लहानसे गाव रिकामे झाले. Ajni Police Quarter ते मिळेल त्या ठिकाणी किरायाच्या घरात राहायला गेले. नव्याने २३३ क्वाॅर्टर बांधकाम करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पाेलिस अधीक्षक कार्यालयाकडून अप्पर पाेलिस महासंचालक (लाेहमार्ग) यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यांच्याकडून महाराष्ट्र पाेलिस हाउसिंग कार्पाेरेशन (मुंबई) यांच्याकडे सादर करण्यात आला. आता या प्रस्तावाला जवळपास दाेन वर्षांचा कालावधी झाला. मात्र, नवीन बांधकामासंदर्भात कुठल्याही प्रकारची हालचाल हाेताना दिसत नाही.
जवळपास १६८ कुटुंब याठिकाणी राहात हाेते. सण, उत्सव माेठ्या गुण्यागाेविंदाने साजरे व्हायचे. कार्यक्रमात सर्वच ठाण्याचे पाेलिस अंमलदार सहभागी व्हायचे. त्यामुळे सहाजिकच सर्वांच्या भेटी गाठी व्हायच्या. विविध विषयावर चर्चा व्हायच्या. गावच रिकाचे झाल्याने कुणी फिरकूनही पाहात नाही.Ajni Police Quarter  या क्वाॅर्टरमध्ये केवळ एक कुटुंब आहे. दिव्यांग असल्याने त्यांना किरायाच्या घरात राहणे आणि तिथून कार्यालयात ये-जा करणे शक्य नाही. त्यांची अडचण लक्षात घेता प्रशासनानेही त्यांना सहकार्य केले. पाेलिस अधीक्षक पदी कायम अधिकारी नसल्यामुळे कदाचित पाठपुरावा हाेत नसावा. कायम अधिकारी मिळाल्यास बहुतांश प्रश्न सुटतील, अशी पाेलिस वर्तुळात चर्चा आहे.
क्वाॅर्टरसंबधी पाठपुरावा करणार
नव्याने क्वाॅर्टर बांधकामाचा प्रस्ताव पाेलिस महासंचालक कार्यालयाला पाठविला आहे. Ajni Police Quarter यासंदर्भात महाराष्ट्र पाेलिस हाउसिंग कार्पाेरेशन या कार्यालयाकडे पाठपुरावा करणार आहे.
 
प्रवीण साळुंखे
अप्पर पाेलिस महासंचालक (लाेहमार्ग)