आयुर्वेद व्यासपीठतर्फे पद्मश्री डॉ.विलास डांगरे यांचा सत्कार

    दिनांक :04-Feb-2025
Total Views |
नागपूर,
Ayurveda Vyaspith Nagpur आयुर्वेद व्यासपीठ ही एक आयुर्वेदिक वैद्यांचे संघटन असलेली अग्रणी संस्था आहे. ही संस्था गेल्या २७ वर्षांपासून कार्यरत असून संस्थेतर्फे सेवा,संशोधन,शिक्षण आणि प्रचार प्रसार या चतुःसुत्रीवर आधारित कार्य चालते.
 
 
 
deepa
 
 
 ज्येष्ठ होमिओपॅथ आणि माजी महानगर संघचालक डॉ. विलास डांगरे यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री घोषित करण्यात आली आहे. त्यानिमित्त आयुर्वेद व्यासपीठ, नागपूर शाखेतर्फे त्यांचे मानवस्त्र, श्रीफळ, रोप आणि सन्मानपत्र देऊन अभीष्टचिंतन करण्यात आले.Ayurveda Vyaspith Nagpur आयुर्वेद व्यासपीठ नागपूर शाखेचे अध्यक्ष वैद्य श्रीकांत वणीकर, वैद्य मीरा औरंगाबादकर, वैद्य दत्तात्रय सराफ, वैद्य मृत्युंजय शर्मा, वैद्य मृणाल जामदार, वैद्य हितेंद्र मैद, वैद्य प्रसाद देशपांडे ,डॉ. स्वाती वणीकर वैद्य सचिन मेंढे, वैद्य प्रतिन पट्टलवार, वैद्य वैभव काकडे, वैद्य शिशिर गोस्वामी ,व अन्य कार्यकारणी सदस्य, यांनी डॉ डांगरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना गौरव पत्र देऊन सन्मानित केले यावेळी आयुर्वेद व्यासपीठाची माहिती आणि कार्य याविषयी देण्यात आली.