भूतानचे राजे महाकुंभात पोहचले, त्रिवेणी संगमात केले स्नान

मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी देखील उपस्थित

    दिनांक :04-Feb-2025
Total Views |
प्रयागराज, 
Bhutan King reached Mahakumbh १३ जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ सुरू झाले आहे. करोडो भाविक येथे श्रद्धेने स्नान करतात आहे. त्यासोबतच राजकीय पक्ष ,अभिनेते,परराष्ट्र मंत्री यांची पहिली पसंत महाकुंभ ठरला आहे. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक सोमवारी रात्री उत्तर प्रदेशच्या राजभवनात पोहोचले. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी, भूतानच्या राजाने राजभवनातील महात्मा गांधींजींच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली. भूतानच्या राजाच्या सन्मानार्थ राजभवनात एका रात्रीच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये भूतानचे शिष्टमंडळ आणि भारत सरकार आणि राज्य सरकारचे उच्च अधिकारी आणि प्रतिष्ठित पाहुणे उपस्थित होते.मुख्यमंत्री योगी आणि भूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी संगमात स्नान केले. यानंतर गंगा पूजा आणि आरती करण्यात आली. अरैल घाटावरून बोटीत बसले. संगमला गेले आणि आंघोळ केली.
 
cm yogi 
 
 
काय उद्देश असेल नेमका?
भारत आणि Bhutan King reached Mahakumbh भूतान या दोन देशांमध्ये पहिल्यापासून चांगले संबंध आहेत. भौगोलिकदृष्ट्या भूतानच्या ३ सीमा भारताला तर एक चीनला लागून आहे. त्यामुळे, भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याकडे भूतानचा भर असतो. त्यातच आता भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हे भारत दौऱ्यावर आले आहेत असे म्हणायला हरकत नाही . अतिशय कमी वयात त्यांची त्या पदावर निवड झाली. वांगचूक यांच्याबाबत आणखीही काही गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत.भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक भारताच्या दौऱ्यावर आहेत.दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा करणार आहेत. भूतान आणि चीन त्यांच्या सीमेबाबतचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, मुख्यतः त्यांनी महाकुंभाला प्राधान्य दिले आहे .
 
आर्थिक अजेंडा महत्वाचा
भारतासाठी, Bhutan King reached Mahakumbh भूतानचा सामाजिक-आर्थिक विकास आणि प्रादेशिक अखंडता नेहमीच त्याच्या परराष्ट्र धोरणाच्या अजेंड्यात एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ धोरणात्मक भागीदारी आहे. ज्यामध्ये, भारत भूतानला आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा यासह विविध क्षेत्रांमध्ये मदत करतो. भारत हा केवळ भूतानचा सर्वात मोठा विकास भागीदार नाही तर वस्तू आणि सेवांच्या व्यापारासाठी स्रोत तसेच बाजारपेठ म्हणून, सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. भारत केवळ भूपरिवेष्ठित भूतानला संक्रमण मार्ग प्रदान करत नाही तर जलविद्युत, अर्ध-तयार उत्पादने, फेरोसिलिकॉन आणि डोलोमाइटसह भूतानच्या अनेक निर्यातीसाठी सर्वात मोठी बाजारपेठ देखील आहे.