- वेळेवर निधी देणार्या ३५ देशांत सहभाग
संयुक्त राष्ट्र,
Funding for the United Nations भारताने २०२५ वर्षासाठी संयुक्त राष्ट्रांच्या नियमित अर्थसंकल्पासाठी ३.७६४ कोटींचा (३७.६४ दशलक्ष निधी दिला आहे. संयुक्त राष्ट्राच्या नियमित अर्थसंकल्पासाठी वेळेवर मदत देणार्या ३५ देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. संयुक्त राष्ट्राने जारी केेलेल्या निवेदनात भारताचे आभार मानले आहे.
सदस्य देशांसाठी Funding for the United Nations संयुक्त राष्ट्र संघाला निधी देण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारीपर्यंंत होती. त्यापूर्वीच भारतासह ३५ देशांनी संयुक्त राष्ट्राच्या खर्चासाठी निधी दिला आहे. नियमित मूल्यांकन निधी देणार्या सदस्य देशांची नावे सांगताना संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनिया गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिया यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले की, वेळेच्या आधी निधी दिल्याबद्दल आम्ही भारताचे आभार मानतो. भारत सातत्याने संयुक्त राष्ट्रांच्या अर्थसंकल्पात आपले आर्थिक योगदान वेळेवर देणार्या सदस्य राष्ट्रांमध्ये आहे. भारताने नेहमीच संयुक्त राष्ट्राला सहकार्य केले नियमित आणि वेळेवर निधी देणार्या ३५ सदस्य देशांमध्ये भारताचा समावेश आहे.