नागपूर,
Inauguration of Poster Exhibition रेल्वेच्या विद्युतीकरणाला शंभर वर्षे झाल्याबददल नागपूरच्या रेल्वेस्थानक परिसरात पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन मध्य रेल्वेचे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्या हस्ते झाले. यावेळी पी. एस. खैरकर, रूपेश चांदेकर, विजय गौतम, मित्तल आदींची उपस्थिती होती. रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा रेल्वेने गाठला असून, ३ फेब्रुवारी १९२५ रोजी भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला (मुंबई) दरम्यान धावली होती. या ट्रेनने १६ किमीचे अंतर पार केले होते.
विद्युतीकरणाच्या १०० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव प्रसंगी नागपूर रेल्वे स्थानकावर विशेष चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, बनारस लोकोमोटिव वर्क्स, पटियाला लोकोमोटिव्ह वर्क्स आदी युनिट्सने बनवलेल्या विद्युत इंजिनांच्या विकास प्रवासाचे दर्शन प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने पोस्टर्स आणि बॅनर्सच्या माध्यमातून रेल्वे इंजिनांचे तांत्रिक तपशील विद्यार्थी आणि सर्व नागरिकांसाठी माहितीच्या स्वरूपात बघता येणार आहे.
रेल्वेच्या प्रवासात क्रांतिकारी बदल
मुख्यत: रेल्वे Inauguration of Poster Exhibition विद्युतीकरणामुळे भारतीय प्रवासात क्रांतिकारी बदल झाले, जसे की इंजिन बदलण्याची गरज कमी झाली, रेल्वे विलंबात घट, प्रवास अधिक विश्वासार्ह बनला, ऑपरेशनल खर्चात बचत झाली तसेच आधारित स्टीम इंजिनांवरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे रेल्वे अधिक पर्यावरणपूरक झाली असल्याची माहिती विनायक गर्ग यांनी दिली.रेल्वेचे हे प्रदर्शन अधिक आकर्षक बनवण्यासाठी नागपूर स्थानकावर स्क्रीन लावण्यात असून रेल्वेची डॉक्युमेंटरी दाखवली जात आहे.
विद्यार्थ्यांसाठी खास सेल्फी पॉइंट
नागपूर मंडळातील Inauguration of Poster Exhibition रेल्वे विद्युतीकरणाचा गौरवशाली इतिहासात प्रामुख्याने नागपूरहून सुरू होणार्या महत्त्वाच्या गाड्यांचे विद्युत इंजिनांच्या विकास प्रवासाचे तांत्रिक दाखले, इलेक्ट्रिक लोको शेड, अजनी आणि गव्हर्नमेंट मेंटेनन्स डेपो येथील देखभाल कार्यांची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी खास सेल्फी पॉइंट देखील आला आहे. रेल्वे स्थानक परिसरात मनोरंजनात्मक कार्यक्रमासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिनाभर चालणार्या या उत्सवामध्ये प्रवासी आणि रेल्वेचे कर्मचारी सहभागी होणार आहे.
...