Kerala Anganwadi menu केरळमधील एका अंगणवाडीत एका मुलाने उपमाऐवजी बिर्याणी आणि चिकन फ्रायची मागणी केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मुलाच्या या निष्पाप मागणीने सरकारचे लक्ष वेधले आणि आता अंगणवाडीच्या जेवणाच्या मेनूमध्ये बदल करण्यात येईल. राज्याच्या आरोग्य आणि महिला आणि बाल कल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनी स्वतः हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आणि मुलाच्या मागणीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सरकार लवकरच अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या मेनूचा आढावा घेईल, जेणेकरून मुलांना चांगले पोषण मिळू शकेल.
अंगणवाडीच्या मेनूमध्ये होणार मोठा बदल
मंत्री वीणा Kerala Anganwadi menu जॉर्ज यांनी शंकू, तिच्या आई आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की शंकूच्या सूचना लक्षात घेऊन अंगणवाडी मेनूचा आढावा घेतला जाईल. मुलांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी, अंगणवाड्यांमध्ये विविध प्रकारचे अन्नपदार्थ पुरवले जाईल , असे त्यांनी सांगितले. सरकारने अंडी आणि दूध देण्याची योजना आधीच यशस्वीरित्या राबवली आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्याने, स्थानिक संस्था अंगणवाड्यांमधील मुलांना चांगले पोषण मिळावे. म्हणून, विविध पौष्टिक अन्नपदार्थ देखील पुरवतात.
आता अंगणवाडीत मिळणार बिर्याणी आणि चिकन फ्राय
व्हायरल Kerala Anganwadi menu व्हिडिओमध्ये, मुलगा त्याच्या आईला सांगतो, "मला अंगणवाडीत उपमा ऐवजी बिर्याणी आणि चिकन फ्राय हवे आहे." त्याच्या आईने सांगितले की, शंकू घरी बिर्याणी खात असताना त्याने ही मागणी केली, जी त्याने एका व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केली आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केली.. सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही मुलाला पाठिंबा दिला आणि सरकारने तुरुंगातील कैद्यांना दिले जाणारे अन्न कमी करावे आणि अंगणवाड्यांमधील मुलांना चांगले अन्न द्यावे अशी विनंती केली.