नागपूर,
Padmagandha Pratisthan -पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान नागपूर या संस्थेच्या २०२३/२४ च्या राज्यस्तरीय वाड्.मय पुरस्कारांची घोषणा केली आहे. पुरस्कार वितरणाचा सोहळा रविवार दिनांक २ मार्च २०२५ ला सकाळी दहा वाजता बाबूराव धनवटे सभागृहात होईल. पुरस्कार विजेत्यांमध्ये सुधा कुसुम कादंबरी पुरस्कार . शुभांगी ताई भडभडे पुरस्कृत, डॉ.हंसराज वैद्य, नांदेड यांच्या "असाध्य ते साध्य" या आत्मचरित्रपर कादंबरीला, डॉ. नंदकुमार राऊत, मुंबई यांच्या "दौशाड" कादंबरीला जाहीर झाला आहे. राम भोंडे व छाया कावळे कथा पुरस्कार हा "कवडशांचे फूल" संजीवनी बोकील, पुणे यांना तर दीर्घकथेच्या अंतर्गत "खर्जुरवाहिका आणि इतर कथा" या डॉ. रमा गोळवलकर यांच्या कथासंग्रहाला विशेष पुरस्कार प्राप्त झाला. स्व. विमलताई देशमुख ललित लेखन पुरस्कार हा "अवघा रंग एक झाला" कलिका बापट गोवा, "प्रतिभा रंग" प्रतिभा सराफ मुंबई, आणि "अवघा तो शकुन" डॉ.लीला निकम नागपूर, यांना प्राप्त झाला.
स्व. विठ्ठलराव बोबडे स्मृती आणि कुसुम कमलाकर काव्य पुरस्कार हा "चिंब सुखाचे तळे" जयश्री अंबासकर नागपूर आणि "सूर स्पंदनांचे" साधना सुरकर तेलरांधे नागपूर या काव्यसंग्रहांना प्राप्त झाला.Padmagandha Pratisthan स्व. मंदाकिनी लोही पुरस्कार हा डॉ. सुनंदा चरडे दुबे यांच्या "विंदाचे काव्य विश्व" या समीक्षात्मक पुस्तकाला प्राप्त झाला. स्व. शांताबाई शेकदार बाल साहित्य पुरस्कार "फुलकई" मंदा नांदुरकर अमरावती, स्व. शकुंतला खोत नाट्य लेखन पुरस्कार "एकाकी" निरंजन माधव नागपूर यांना प्राप्त झाला. वसुमती काकडे लघुकथा पुरस्कार वर्षा देशपांडे पुरस्कृत राजश्री शिरभाते, लंडन आणि राधिका राजंदेकर नागपूर, कै. केशवराव मारोतकर स्मृती पुरस्कार विजया कडू अमरावती, तर पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान विशेष साहित्य पुरस्कारामध्ये "योगोपचार" श्री.राम खांडवे, "कलेकडून अध्यात्माकडे" माधवी बोरीकर, तसेच प्रवास वर्णनासाठी श्री. संजय कठाळे यांच्या "अगं नर्मदे" या पुरस्कारांसाठी निवड झालेली आहे सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन.
सौजन्य:स्वाती मोहरीर,संपर्क मित्र