-'युवांसाठी उद्योजकतेचा प्रवास' कार्यशाळेचे उदघाटन
नागपूर,
RTMNU : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत 'युवांसाठी उद्योजकतेच्या प्रवास' या विषयावर तीन दिवसीय प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ आयक्यूएसी, पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन आणि इनफेड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूर यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उदघाटन मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ रोजी औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ. ए. के. डोरले सभागृह पार पडले.

प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे अध्यक्षस्थान आयआयएल संचालक डॉ. निशिकांत राऊत यांनी भूषविले, प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक तथा विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष विशाल अग्रवाल, इनफेड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरचे सीओओ डॉ. शिवाजी धवड, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, कार्यशाळा संयोजिका तथा आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. एच. इंदूरवाडे, समन्वयक डॉ. अपर्णा समुद्र यांची उपस्थिती होती. RTMNU यावेळी उपस्थितांचे मार्गदर्शन करताना समाजातील समस्यांचे समाधान शोधत गरज ओळखून उद्योग उभारण्याचे आवाहन विशाल अग्रवाल यांनी केले. डबघाईस आलेल्या त्यांच्या उद्योग समूहाला कशाप्रकारे उत्तम आर्थिक स्थितीत आणले याचे अनुभवबोल देखील सांगितले.
यावेळी डॉ. शिवाजी धवड यांनी मार्गदर्शन करताना युवकांनी उद्योग निर्मिती क्षेत्रात येण्याची का गरज आहे, याबाबत माहिती दिली. अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी मार्गदर्शन करताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) मध्ये रोजगार निर्मितीच्या अनेक संधी असल्याचे सांगितले. प्रत्येकाची गरज वेगळी असून त्यांच्या आवश्यकतेनुसार नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रत्यक्षात साकारण्याचे आवाहन त्यांनी केले. RTMNU सोबतच नाविन्यपूर्ण संकल्पनांची जग वाट पाहत आहे, असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषण करताना डॉ. निशिकांत राऊत यांनी स्टार्टअपमधून कशाप्रकारे नवीन उद्योजक निर्माण झाले याची माहिती दिली. तुम्हीच तुमच्या भविष्याचे शिल्पकार असल्याचे सांगत उद्योग निर्मिती क्षेत्रात तरुणांनी येण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक करताना कार्यशाळेच्या संयोजिका डॉ. स्मिता आचार्य यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबाबत विस्तृत माहिती दिली. कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग नोंदविला आहे उपस्थित आमचे आभार डॉ. अपर्णा समुद्र यांनी मानले.