नागपूर,
Cricket Match Nagpur जामठा स्टेडियमवर उद्या ६ फेब्रुवारीला भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याची तिकिटे तासाभरात संपली. यावरून क्रिकेटप्रेमींच्या संभाव्य गर्दीचा अंदाज येऊ शकताे. सामन्याच्या दिवशी वाहतुकीची काेंडी हाेऊ नये आणि तसा प्रसंग उद्भवलाच तर वाहतूक त्वरित सुरळीत करण्यासाठी ड्राेनची मदत घेतली जाणार आहे. ड्राेनच्या माध्यमातून वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. दाेन ड्राेन सतत फिरत असतील, अशी माहिती पाेलिस उपायुक्त (वाहतूक) अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उद्या भारत विरुद्ध Cricket Match Nagpur इंग्लंड यांच्यात एकदिवसीय क्रिकेट सामना खेळला जाणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह आहे. तब्बल सहा वर्षांनंतर नागपुरात आंतरराष्ट्रीय सामना हाेत असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेत वाहतूक पाेलिसांनी नियाेजन केले आहे. झीराे माईल ते जामठा स्टेडियमपर्यंत साडेपाचशे वाहतूक पाेलिसांचा बंदाेबस्त ठेवण्यात येणार आहे. जामठा स्टेडियम परिसरात माेठा बंदाेबस्त राहणार आहे. व्हीसीएकडून पार्किंगसाठी जागा देण्यात आली आहे. याशिवाय, खाजगी पार्किंगही आहे. खाजगी वाहनांनी येणाऱ्या क्रिकेटप्रेमींनी पार्किंगमध्ये वाहने शिस्तीने उभी करावी, जेणेकरून दुसऱ्यांना त्रास हाेणार नाही तसेच वाहन काढताना वाहतुकीची काेंडी हाेणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अस्ताव्यस्त आणि Cricket Match Nagpur जागा मिळेल तिथे वाहने उभी करून वाहतुकीची काेंडी करणाऱ्यांची वाहने उचलण्यासाठी पाच टाेईंग व्हॅन्स तैनात राहणार आहेत. या व्हॅन्सच्या मदतीने अस्ताव्यस्त वाहने उचलून जमा केली जातील. शिवाय दंडही आकारला जाईल. दाेन तासांपूर्वीच स्टेडियमवर आल्यास गर्दी टाळून सामन्याचा आनंद घेता येईल. त्यादृष्टीने क्रिकेटप्रेमींनी नियाेजन करावे. क्रिकेटप्रेमींना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून, ठिकठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत.
मेट्राेचा वापर करावा
क्रिकेट सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजे ५ फेब्रुवारी राेजी वाहतूक पाेलिस रंगीत तालीम करणार आहेत. वर्धा मार्गावर जामठापर्यंत ही रंगीत तालीम हाेईल. वाहतुकीचे नियाेजन, काेंडी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही रंगीत तालीम करण्यात येईल. क्रिकेटप्रेमींनी मेट्राेचा वापर केल्यास गर्दी टाळून सर्वांना क्रिकेट सामन्याचा आनंद घेता येईल.
प्रेक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना
सर्व Cricket Match Nagpur वाहनचालकांनी जामठा टी पाॅईंटपर्यंत वर्धा मार्गाचा अवलंब करावा. चारचाकी वाहनांसाठी स्टेडियमच्या अगदी समाेरच बी, डी-1 आणि डी-2 अशी जागा निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय पार्किंग ई आणि एफ मध्ये अतिरिक्त जागा देण्यात आली आहे. बी, डी-1 आणि डी-2 मध्ये वाहने पार्क करणाऱ्यांनी सामना संपल्यानंतर बाहेर पडताना सांगितलेल्या मार्गाचाच वापर करावा. स्टेडियमशेजारी पार्किंग सी दुचाकी वाहनांसाठी राखीव आहे. ती जागा भरल्यास पार्किंग एफ मध्ये अतिरिक्त जागा दिली जाईल. पार्किंगच्या सर्व जागा ७५ टक्के भरल्यास सर्व वाहनांना जामठा टी पाॅईंटवरून वर्धा राेड पार्किंग ई आणि एफ कडे वळविले जाईल. पार्किंगची ही जागा जामठ्यापासून एक किमी अंतरावर आहे. टी पाॅईंटपासून ये-जा करण्यासाठी बसेस ई आणि एफ पार्किंगपासून जामठा टी पाॅईंटपर्यंत धावतील.