पुणे,
Shirish More Maharaj Suicide जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज आणि प्रसिद्ध शिव व्याख्याते ह.भ.प.शिरीष मोरे महाराज यांनी आपले आयुष्य संपवले आहे. प्रसिद्ध शिव व्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनास्थळी देहूरोड पोलीस दाखल झाले आहे, चौकशी सुरू करण्यात आली आहे.
शिरीष महाराज मोरे यांनी नवीन घर बांधले होते. खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते. मंगळवारी रात्री मोरे वरील खोलीत आराम करण्यासाठी गेले होते. सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नव्हते. त्यामुळे घरातील सदस्याने दरवाजा ठोठावला पण आतून प्रतिसाद मिळत नव्हता. Shirish More Maharaj Suicide . त्यामुळे दार तोडण्यात आले. मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. नुकताच त्यांचा टिळा झाला होता. Shirish More Maharaj Suicide २० फेब्रुवारीला रोजी मोरे यांचा विवाह होणार होता. यामुळे या घटनेमुळे देहूगावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, प्राथमिक दृष्ट्या आर्थिक विवंचेनेतून आत्महत्येचे केल्याचे कळत असल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले. अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. दरम्यान, ह.भ.प. शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.