तभा वृत्तसेवा
गिरड,
Girad Police Station Udmanjar भल्याने पोलिस स्टेशनची पायरी चढू नये असे सामान्यपणे म्हटले जाते. जनता पोलिसांच्या नावाने आजही दूरच राहतात... परंतु, तो एक वर्षांपासुन पोलिस स्टेशनच्या परिसरात तर कधी बसस्थानकात मुक्कामाला राहत होता... रात्र झाली की तो बाहेर निघायचा... शेजार्यांच्या घरात घुसायचा... त्याची प्रचंड दहशत होती... परिसरातील नागरिकांनी त्याला पकडण्याची मागणी केली होती. एक वर्ष त्याने हुलकावनी दिली... आज येथील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये तो दडून असताना येथील युवकांनी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. हा दहशत माजवणारा कोणी दहशतवादी नव्हता ना चोर... पोलिस स्टेशन परिसरात राहून शेजार्यांना त्रस्त करणारा तो होता उदमांजर!
वर्षभर्यापासून गिरड पोलिस स्टेशन परिसरात वास्तव्यास असलेला उदमांजर शेजारच्या घरात घुसून दहशत पसरवीत असल्याने नागरिक हैराण झाले होते. व्यापार संकुल चाळीत हा उदमांजर गुरुवार 6 रोजी सायंकाळी पकडण्यात आल्याने परिसरातील कुटुंबियांची दहशतीतून सुटका झाली आहे. उदमांजराला पकडण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी वन विभागाकडे केली होती. मात्र, रात्रीच्या वेळीस घरात घुसणारा उदमांजर पकडणे जिकरीचे झाले होते. लहान मुलं, महिला उदमांजराला पाहून भयभीत होत होते. येथील बस स्थानक चौकातील मुख्य रस्त्यालगत आणि पोलीस ठाण्याच्या परिसरातील झूडपात हा तो मुक्कामाला होता. रात्रीच्या सुमारात शेजारच्या घरात घुसायचा. Girad Police Station Udmanjar हा उदमांजर शॉपिंग कॉम्पलेक्सच्या वरील मजल्यावरील गाळ्यात आढळून आला. युवकांनी मोठ्या शिताफीने त्याला जेरबंद करून वनविभागाच्या स्वाधीन केले. वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक पि. डी. बेले, वनसेवक नरेंद्र दर्वे, युवक सोनू भांदककर, आनंद हलवाई, अनुप डंभारे, करण परचाके, यांनी उदमांजरला सुखरूप मोहगाव जंगलात सोडले