माजी क्रिकेट कर्णधार विरेंद्र सेहवाग व मिताली राज उद्या बुलढाण्यात

08 Feb 2025 19:55:10
बुलढाणा, 
Buldhana-Dharmaveer MLA Cup : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मवीर आमदार चषक आयोजित करण्यात आला आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिमपूर्व व अंतिम सामन्यासाठी तसेच जिजामाता लॉन व प्रेक्षक गॅलरीत दिवसरात्र उंच पथदिव्याचे भूमिपूजन सोहळ्याकरीता भारताचा माजी कर्णधार फलंदाज विरेंद्र सेहवाग व महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
 
 
 
BUL
 
 
उद्या दि. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता जिजामाता क्रिडा व व्यापारी संकूलाच्या मैदानावर हा सोहळा संपन्न होणार आहे. यासोबतच आ. संजय गायकवाड, युवा सेना प्रमुख मृत्यूंजय गायकवाड यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याला क्रिकेटप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन धर्मवीर आमदार चषक संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0