प्रतापगड यात्रेवर निर्माणाधिन रस्त्याचे संकट

08 Feb 2025 18:31:29
अर्जुनी मोर,
Pratapgad Yatra तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्री यात्रा व दर्गा येथे 26 फेब्रुवारीपासून भव्य यात्रा सुरु होत आहे. यानिमित्त भोलेनाथाचे दर्शन व दर्ग्यावर माथा टेकण्यासाठी लाखो भाविक येतात. भाविकांना येजा करण्यासाठी असलेल्या एकमेव मुख्य मार्गाची सुकळी ते गोठणगाव- प्रतापगडपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु आहे. रस्त्याचे खोदकाम झाल्याने प्रतापगड यात्रेवर सावट निर्माण झाले आहे. दरम्यान आ. राजकुमार बडोले यांनी नुकतीच रस्त्याची पहाणी केली. यावेळी त्यांनी रस्ता बांधकामावर नाराजी व्यक्त करुन जिल्हाधिकारी व महाराट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाकडे तक्रार केली असून प्रशस्त, दर्जेदार, गुणवत्तापुर्ण रस्ता तयार करण्यासाठी लक्ष घालण्याची सूचना केली आहे.
 
Pratapgad Yatra
 
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळातर्फे धाबेटेकडी- अर्जुनी मोर-सुकळी-गोठणगाव राज्य मार्गाचे मजबुतीकरण मंजुर आहे. सुकळी ते प्रतापगड फाटा गोठणगावपर्यंत कामाला सुरुवात झाली आहे. चार दशकभरपुर्वीचा मार्ग असून रुंदी 7 मीटर आहे. डांबरी रस्ता प्रसस्त आहे. Pratapgad Yatra अंतरानुसार सीर्डवर्क बनायला पाहिजे. मात्र साडेतीन मीटरचे बनत असल्याची शंका बडोलेंनी व्यक्त केली आहे. रस्ता जंगलातून जातो. वनविभागाची परवानगी घेण्यात आली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रतापगड महाशिवरात्री व उर्स शरिफ यात्रा 26 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे.
 
लाखो भावीक प्रतापगड येथे याच रस्त्याने दर्शनासाठी येतात. यावेळी मार्गावर हजारो वाहणांची वर्दळ असते. या पर्यटन व धार्मीकस्थळी वर्षभर पर्यटक, भाविक याच रस्त्याने येजा करतात. सुकळीपासुन गोठणगावपर्यंत सिडीवर्कचे काम सुरु आहे. वदळीच्या रस्त्यावर सर्वत्र मातीचे ठिगारे, निरुपयोगी साहित्य अस्तव्यस्त असल्याने वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. सुकळीपासुन संपुर्ण रस्त्याचे खोदकाम केले आहे. Pratapgad Yatra यामूळे वाहतुकीची कोंडी होते आहे. यामूळे ऐतिहासिक प्रतापगड यात्रेवर रस्त्याचे संकट निर्माण झाले आहे. निर्माणाधिण रस्त्यावर वाहतुक कोंडी होत अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनासह महाराष्ट्र राज्य पायाभूत महामंडळाने रस्त्याची पहाणी करुन भाविकांवर संकट ओढावणार नाही याची खबरदारी घेत उपाययोजना करावी, सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने रस्ता व सिडीवर्क साडेसात मिटर पेक्षा जास्त बनवुन प्रसस्त व मजबुत रस्ता बनावावा, अशी मागणी बडोलेंनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0