श्री संत बिरबलनाथ महाराज यांचा यात्रा महोत्सव

    दिनांक :08-Feb-2025
Total Views |
मंगरूळनाथ,
Shri Sant Birbal Nath Maharaj येथील योग तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज यांची यात्रा १५ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत भरणार आहे. श्री बिरबलनाथ महाराजांनी शासकीय अधिकारी वर्ग व हजारो जनसमुदायासमोर ४ फेब्रुवारी १९२८ रोजी संध्याकाळी ६ वाजता योग विद्याच्या बळावर संजीवन जिवत समाधी घेतली.
 
Shri Sant Birbal Nath Maharaj
 
त्या समाधी दिवसानिमीत्त पोर्णिमा १२ फेब्रुवारी रोजी अभिषेक होम व पुजेचा कार्यक्रम होणार असून, ११ वाजता श्री बिरबलनाथ महाराज यांचे लघुचरित्र ग्रंथाचे संगितमय वाचन उत्त्तमराव पाटील गावंडे रा. वरूड यांच्या मधूर वाणीतून होणार आहे. १५ सकाळी ९ वाजता श्री ची महापूजा व अभिषेक वेद-शास्त्र संपन्न ब्राम्हणांच्या हस्ते होणार असून, दुपारी ३ ते ६ वाजता दरम्यान हनुमंत महिला भजनी मंडळ मंगलधाम यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. Shri Sant Birbal Nath Maharaj १६ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजता जय हनुमान सांप्रदायीक भजनी मंडळ यांचा हरीपाठाचा कार्यक्रम होणार असून १७ फेब्रुवारी रोजी रोजी १२ ते ५ वाजेपर्यंत वाजेपयर्र्ंत मंदीरातून महिला व पुरुष अश्या दोन लाईनबारी मधून महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता विशाल महाराज आळंदीकर यांचा विनोदाने भरपूर किर्तनाचा पंचरंगी कार्यक्रम होणार आहे.
 
१८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता श्री बिरबलनाथ महाराज यांचे पालखीची गावामध्ये मिरवणूक निघणार असून, १२ ते १.३० वाजता मंदीरात श्री दहीहंडी व गोपाळकाला पांडूरंग महाराज गावंडे रा. शेलोडी यांचे मधुरवाणीतून तर श्री संत योगीनाथ महाराज यांचे शुभहस्ते होणार आहे. Shri Sant Birbal Nath Maharaj २२ व फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजनाचे भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ व २५ फेब्रुवारी रोजी दररोज सायंकाळी ४ ते ६ पर्यंत भजन गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले आहे. नागरीकांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे सचिव रामकुमार रघुवंशी व अध्यक्षा पुष्पा रघुवंशी व अविश रघुवंशी यांनी केले आहे.