अमेरिकेतील १८ हजार अप्रवासी भारतीयांची यादी तयार

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह नागपुरातील लाेकांचा समावेश

    दिनांक :09-Feb-2025
Total Views |
नागपूर,
List of Indians in America prepared ३५ काेटी लाेकसंख्या असलेल्या अमेरिकेत जवळपास सव्वासात लाख भारतीय आहेत. त्या सर्वांचा व्हीजा संपला आहे. त्यापैकी, १८ हजार लाेकांची यादी तयार करण्यात आली असून, लवकरच त्यांना टप्प्या टप्प्याने भारतात पाठविण्याची तयारी झाली आहे. पहिल्या टप्प्यात १०४ भारतीयांना लष्कराच्या विमानाने ४ फेब्रुवारीला भारतात पाठविण्यातआले. त्यात नागपुरातील हरप्रीतसिंगचा समावेश हाेता. अमेरिका ते भारत असा तीस तासांचा प्रवास सी. १७ या विमानाने पूर्ण केला.
 
 
  
america
 
 
 
अप्रवासी भारतीयांना कमर्शिअल विमानाने पाठवायला पाहिजे हाेते. परंतु, अमेरीकेतील काद्यानुसार, गुन्हेगार गृहीत धरून त्यांना लष्कराच्या विमानाने पाठविण्यात आले. विशेष म्हणजे, जे देश अप्रवासीयांचा स्वीकार करणार नाही, अशा लाेकांना ग्वांताना कारागृहात पाठविण्यात येणार आहे. तशी व्यवस्था अमेरीका सरकारने केल्याची सूत्रांची माहिती आहे. चांगले जीवन जगण्याची प्रत्येकाला ईच्छा असते. परंतु, जीवनाचा दाव लावत चांगले जीवन कसे जगता येईल. असा प्रश्न अमेरिकेच्या कारवाईवरून उपस्थित हाेत आहे.
 
 
२२ List of Indians in America prepared फेब्रुवारी २०२४ ला जाॅर्जिया विद्यापीठ परिसरात एका विद्यार्थिनीची हत्या झाली हाेती. लॅकेन रिले असे त्या विद्यार्थिनीचे नाव हाेते. एका अप्रवासी व्यक्तीने भर दिवसा तिचा खून केला हाेता. या घटनेमुळे अमेरिकेत प्रचंड खळबळ उडाली. या घटनेची डाेनाल्ड ट्रंप यांनी गंभीर दखल घेतली. पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिकेत अवैधपणे राहात असलेल्या अप्रवासींयांसाठी एक कायदा तयार करण्यात येईल. असे त्यांनी जाहीर केले हाेते. २० जानेवारीला त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आणि कायदा तयार करण्याचे आश्वास पूर्ण केले. लॅकेन रिले अ‍ॅक्ट असे त्या कायद्याला नाव दिले. या कायद्यानुसार जे अप्रवासी अवैधपणे अमेरिकेत राहतात. त्या सर्वांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात येईल. त्यानुसार, ४ फेब्रुवारी राेजी पहिल्या टप्प्यात १०४ भारतीयांना सी.१७ या लष्करी विमानाने भारतात पाठविण्यात आले. यात पंजाब, हरयाणा, चंदीगढ, गुजरात, उत्तरप्रदेश, महाराष्ट्रातील लाेकांचा समावेश हाेता. यापैकी, बहुतेकांची ट्रॅव्हल एजंटने फसवणूक केली. अमेरिकेत सर्वाधिक मॅक्सीकनची संख्या आहे. त्यानंतर एलसाल्वाडाेर, भारत, ग्वाॅटेमाला, हाेंडूरास आदी देशातील लाेक अवैधपणे राहात असल्याचा अमेरिकेचा दावा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भाैतिक सुख सुविधांचे आकर्षण
अमेरिकेत List of Indians in America prepared शिक्षण आणि राेजगारासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. बहुतांश लाेक कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करूनच जातात. परंतु, तेथील भाैतिक सुख सुविधा, जीवनमान, राहणीमान आणि वातावरण बघता विचार बदलताे आणि प्रवासी व्हीजा संपल्यानंतरही अवैधपणे राहतात. अशा पध्दतीने अमेरिकेत राहणाऱ्यांची संख्या तब्बल एक काेटीच्या जवळपास आहे. त्यांना त्यांच्या देशात पाेहाेचविण्याची प्रक्रिया अमेरिका सरकारने सुरू केली आहे.