नवी दिल्ली,
National Deworming Day १० फेब्रुवारी आणि १० ऑगस्ट या दोन दिवशी भारतात नॅशनल डीवर्मिंग डे म्हणजेच राष्ट्रीय जंतनाशक दिन पाळला जातो. १ ते १४ वर्ष वयाच्या मुलांच्या आतड्यांमधल्या जंतांचे पूर्णपणे निर्मूलन करणे हा या दिवसांचा उद्देश आहे. केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात २९% (२४१ दशलक्ष) आढळले आहे. त्याच अनुषंगाने राज्यात National Disinfectant Day 'राष्ट्रीय जंतनाशक दिन' वर्षातून दोनदा राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले होते . जंतनाशक मोहिमेमुळे अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदे झाले . त्यामध्ये बालकांमधील रक्तक्षय, अशक्तपणा व कुपोषणावर नियंत्रण तसेच बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास होणे याचा समावेश आहे.
जंतांमुळे शरीरात रक्ताची कमतरता
आतड्यातील जंत हे मुलांमध्ये अशक्तपणाची वाढ निर्माण होण्यास कारणीभूत ठरते. कारण यात मुलांच्या शरीरातून रक्त कमी होते. अशक्तपणामुळे मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. जंतांमुळे दीर्घकाळ रक्त कमी झाल्यामुळे लोहाची कमतरता निर्माण होते. लोह शरीरात मेंदूचे कार्य, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि स्नायूंचे कार्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. जंताने प्रभावित मुलांना थकवा,अशक्तपणा आणि एकाग्रता कमी होणे अशी लक्षणे आढळून येऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर परिणाम होतो.National Disinfectant Day यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधांचे सेवन करणे गरजेचे आहे. सामान्यतः लिहून दिलेल्या औषधांमध्ये अल्बेंडाझोल किंवा मेबेन्डाझोल यांचा समावेश होतो, जे कृमींना ग्लुकोज शोषून घेण्यापासून रोखतात, ज्यामुळे त्यांची उर्जा कमी होते आणि त्या कृमी मृत पावतात
आरोग्य महत्वाचे
10 फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा केला जातो. शाळा आणि अंगणवाडी सेविका अशा विविध माध्यमांद्वारे मोफत अल्बेंडाझोलचे वाटप करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.मुलांमध्ये जंतनाशक ही काळाची गरज आहे कारण जंतांमुळे मुलांच्या संपुर्ण आरोग्यावर परिणाम होत असतो. आतड्यांतील कृमी मुलाच्या पचनसंस्थेवर परिणाम करतात, ज्यामुळे कुपोषण आणि वाढ खुंटणे अशी लक्षणे दिसून येतात. National Disinfectant Day हे परजीवी अशक्तपणा आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात, ज्यामुळे मुले इतर आजारांना बळी पडतात. मुलांना जंतनाशक औषध देऊन आरोग्यासंबंधीत धोके लक्षणीयरीत्या कमी करता येऊ शकतात आणि त्यांचे संपूर्ण आरोग्य सुधारता येऊ शकते.