नागपूर,
Mohan Mate महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्काॅम पूर्व विदर्भ प्रादेशिक विभाग नागपूरचे सचिव डॉ. दीपक शेंडेकर यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांची भेट घेतली. ज्येष्ठांच्या काही प्रलंबित असलेल्या मागण्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. त्यांनी सांगितले की ज्येष्ठांना सर्व स्तरावर मदत करण्यासाठी ते सदैव तयार असतात. या वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी १० विरंगुळा केंद्र त्यांच्या निधीतून बांधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
फेस्काॅम महाराष्ट्रात मागील ४५ वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखी, समाधानी, निरोगी राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रात फेस्काॅमशी सहा हजार संघ संलग्न असून वीस लक्ष सभासद आहेत. मोहन मते यांना पूर्व विदर्भ प्रादेशिक विभाग फेस्काॅम चे मुखपत्र हितगुज विशेषांक व स्मृति चिन्ह भेंट करण्यात आले. Mohan Mate यावेळी कोषाध्यक्ष सुधीर सालफले, कॅप्टन प्रभाकर विंचुरकर, प्रभाकर सव्वालाखे, प्रल्हाद शेंडे, ईश्वर वानकर, अशोक पाचपोर, काशीनाथ गुमगांवकर, सालफले आदी उपस्थित होते.