नागपूर,
Shalinitai Meghe Hospital वानाडाेंगरीच्या शालिनीताई मेघे हाॅस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये एका अत्याधुनिक 4डी अल्ट ́साऊंड उपकरणाचे लाेकार्पण झाले. राेटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट, राेटरी क्लब ऑफ लेक अॅराेहेड, यूएसए यांच्या ‘अॅडव्हान्स्ड अल्ट ́साऊंड साेनाेग्राी - सपाेटिरग फोयटल डायलेसिस ’ नावाचा ग्लोलाेबल ग्रँट प्राेजेक्ट जीजी2462503 अंतर्गत गरजूंना सुलभ व प्रगत निदान सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने हे 38 लाख रुपये किमतीचे, नवे 4डी अल्ट ́साऊंड उपकरण दान करण्यात आले आहे.
या उपकरणामुळे गर्भाचे लवकर निदान, परिणामी गर्भाशयावर वेळेत उपचार, दरवर्षी अंदाजे 40-50 लाख रुपयांच्या मोफत व अनुदानित चाचण्या, स्कॅन निकाल तासाभरात, त्यामुळे प्रतीक्षा कालावधी कमी, कुठेही नेता येणे शक्य आहे. लाेकार्पणाला दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशाेधन संस्थेचे सल्लागार व माजी आ. सागर मेघे, राेटरी इंटरनॅशनल डिस्टि ́क्ट 3030चे जिल्हा गव्हर्नर राजिंदर सिंग खुराना, राेटरीयन महेश माेकळकर, डाॅ.अनुप मरार, डाॅ. वसंत गावंडे, पीडीजी शब्बीर शाकीर, पीडीजी डाॅ. के. एस. राजन, राजीव वरभे, डाॅ.निलम छाजेड, डाॅ. राजसी सेनगुप्ता, डाॅ. आनंद हातगावकर, डाॅ. वैशाली धवन, अश्वीन रडके, डाॅ. प्रीती बागडे, वीरेंद्र पात्रीकर, श्रीनिवास लेलेे, डाॅ. विजय बाजारे उपस्थित हाेते.हे उपकरण प्रगत तंत्रज्ञानापेक्षा जास्त काही दर्शवते. ते आपल्या समुदायासाठी आशा, सुलभता व सुधारित आराेग्ययसेवेचे प्रतीक आहे, असे राजिंदर सिंग खुराणा म्हणाले.