यवतमाळात तरुणाची हत्या

11 Mar 2025 18:35:10
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Yavatmal murder case : पिण्यासाठी पाणी न दिल्याचा राग मनात धरून एका 27 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने भाेसकून हत्या करण्यात आली. ही घटना येथील एमआयडीसी परिसरातील माेकळ्या जागेत रविवारी रात्री घडली.
 
 
 
murder
 
 
 
साेमवारी सकाळी रक्ताच्या थाराेळ्यात मृतदेह पडून असल्याची माहिती लाेहारा पाेलिसांना मिळाल्याने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठविण्यात आला. विनाेद शंकर शिपलेकर (27, उद्याेगनगर) असे मृताचे नाव आहे. दाेन संशयितांना एलसीबी पथकाने ताब्यात घेतले. पाेलिस सूत्रांनुसार मृतक विनाेद हा हमाली करून उदरनिर्वाह करीत हाेता. त्याच्या जेवणाची व्यवस्था घरापासून काही अंतरावर राहणारी बहीण करत हाेती.
 
 
 
रविवारी रात्री जेवण करून ताे घराच्या दिशेने निघाला हाेता. तेव्हा दाेन आराेपींनी विनाेदला पिण्याचे पाणी मागितले. परंतु त्याने पाणी देणार नाही, असे म्हटले. त्यामुळे रागाच्या भरात दाेघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. घटनेनंतर हल्लेखाेरांनी पळ काढला. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थाराेळ्यात पडून असलेला मृतदेह साेमवारी सकाळी नागरिकांना दिसला.
 
 
याची माहिती मिळताच लाेहारा पाेलिस ठाणेदारांसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे जिल्हा पाेलिस अधीक्षक कुमार चिंता, एलसीबी पाेलिस निरीक्षक सतीश चवरे यांनीसुद्धा घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी कमलेश वाठाेरे यांनी लाेहारा पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंद केला आहे.
Powered By Sangraha 9.0