शेतकर्‍यांसाठी फार्मर आयडी नोंदणीला वेग

    दिनांक :13-Mar-2025
Total Views |
सिरोंचा,
Agristack Scheme केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘अ‍ॅग्रीस्टॅक योजना’ अंतर्गत शेतकर्‍यांची फार्मर आयडी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून या प्रक्रियेला वेग आला आहे. या योजनेद्वारे शेतकर्‍यांना विविध शासकीय योजनांचा लाभ सहज मिळणार आहे. सिरोंचा तहसील प्रशासनाने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आठवडी बाजारासह विविध ठिकाणी जनजागृती उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः तेलगू भाषेतून संवाद साधून अधिकाधिक शेतकर्‍यांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
 
 
Agristack Scheme
 
दुर्गम भागातील शेतकर्‍यांना नोंदणी प्रक्रियेत अडचणी येत असल्यामुळे तालुका प्रशासनाने आठवडी बाजार, सीएससी केंद्रे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी नोंदणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सिरोंचा येथील आठवडी बाजारात तहसीलदार निलेश होनमारे आणि नायब तहसीलदार हमीद सय्यद यांनी शेतकर्‍यांना थेट मार्गदर्शन करून फार्मर आयडीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी नायब तहसीलदार तोटावार, सिरोंचाचे तलाठी पदा व अन्य महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. Agristack Scheme फार्मर आयडी नोंदणीसाठी शेतजमिनीचा सातबारा उतारा, आधार कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. सिरोंचा तालुका प्रशासनाच्या या उपक्रमामुळे शेतकर्‍यांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. लवकरच मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांची नोंदणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे सिरोंचाचे तहसीलदार निलेश होनमारे यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना सांगितले.