निवृत्त पोलिस अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी रमेश मेहता

-कार्यकारिणी बिनविरोध

    दिनांक :16-Mar-2025
Total Views |
नागपूर, 
Nagpur News : महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कल्याणकारी असोसिएशन नागपूरच्या अध्यक्षपदी रमेश मेहता यांच्यासह मागील कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाली. 2025-26 ते 2029-30 असा 5 वर्षांचा त्यांचा कार्यकाळ राहील.
 

NGP 
 
आज रविवारी पोलिस लाईन टाकळीच्या अलंकार सभागृहात आमसभा झाली. निवडणूक अधिकारी अ‍ॅड. प्रकाश प्रजापती व अ‍ॅड. सार्थक चौरसिया मागील कार्यकारिणीची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. नवी कार्यकारिणी- रमेश मेहता (अध्यक्ष), एन.के. इंगळे, अनिल बोबडे (उपाध्यक्ष), एम.सी. गुप्ता (कोषाध्यक्ष), सुरेश महाले (सचिव), नागेश घोडकी (सहसचिव), बाळासाहेब देवलकर, मोरेश्वर उपासे, मोतीराम पाखरे, आबाराव मेंढे, केवाराम हटवार, राजेंद्र धोपटे, सय्यद इकबाल (सदस्य).
प्रमुख पाहुणे अप्पर कोषागार अधिकारी सतीश गोसावी यांच्या हस्ते मावळत्या व नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. सभेत 250 सदस्य उपस्थित होते. उपकोषागार अधिकारी सूशिल जकुलवार व सचिन बैस यांनी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी वेतन धारकांना निवृत्ती वेतनासंबंधाने तसेच इतर भत्तेबाबत मार्गदर्शन केले. सदस्य डी. एम. इंगोले यांनी जादूचे प्रयोग सादर केले. प्रास्ताविक रमेश मेहता, संचालन सुरेश महाले, आभार प्रदर्शन अनिल बोबडे यांनी केले.