लढाया न करता महाराजांनी केले राष्ट्र निर्माणाचे कार्य

-इतिहास संशोधक प्रवीण योगी यांचे प्रतिपादन -विवेकानंद केंद्रातर्फे शिवजयंती उत्सव

    दिनांक :16-Mar-2025
Total Views |
नागपूर,
Praveen Yogi : छत्रपति शिवाजी महाराजांच्या नाट्यमय आणि रोमांचकारी अनेक घटनांपेक्षा महाराजांनी १६३०मध्ये सुलतानी संकटासह शेतकर्‍यांच्या अख्या दुष्काळातून वाचविण्याचे काम केले आहे. शेतकर्‍यांच्या कुटूंबांतील मुलांना आपल्या सैन्यात सहभागी करुन घेत स्वत:चे हंगामी सैनिक तयार केले. केवळ किल्ले जिंकण्यासाठीच शिवाजी महाराजांनी लढाया करीत बसले नाहीत. तर १६४८ ते १६५६ आणि १६६६ते १६६८ दरम्यान लढाई न करता दरम्यानच्या काळात तब्बल दहा वर्षे पर्यंत राष्ट्र निर्माणाचे कार्य केले, असे प्रतिपादन निरीक्षक व इतिहास संशोधक प्रवीण योगी यांनी केले.
 

DSC_9203 
 
 
विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी, शाखे तर्फे युवा नेतृत्व विकसन उपक्रमाअंतर्गत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. सुमतीबाई पांडुरंग देव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शंकरनगर येथील बाबुराव धनवटे सभागृहात शिवजयंती उत्सव प्रसंगी छत्रपति शिवाजी महाराज यांचे जीवन रहस्य’ या विषयावरील व्याख्यानात प्रवीण योगी वेचक वेधक विचार मांडले. यावेळी मंचावर धनंजय जोशी, विलास देशपांडे होते.
 
 
प्रवीण योगी पुढे म्हणाले, स्वराज्य टिकवण्यासाठी सर्वसामान्य जनता शिवाजी महाराजांसोबत अखंड २७ वर्षे लढली आहे. यात जनतेचा महाराजांवर असलेला आत्मविश्वास दिसून येतो. किल्ले जिंकण्यापेक्षा अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांना आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली होती. शिवाजी महाराजांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्याला प्राधान्य नैतिक अधिष्ठान मिळावे म्हणून राज्याभिषेक केला.
 
 
व्याख्यानाच्या सुरुवातीला धरमपेठ महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी कलाकौशल्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने सुजाता दळवी, संतोष कचरे, भरत जोशी, बागेश्री पांडे, श्रावणी बोरीकर आदींची उपस्थिती होती.