साखरबाहुली येथील दर्गाह चौकशीच्या भोवर्‍यात

16 Mar 2025 20:02:50
तभा वृत्तसेवा
गिरड, 
Waqf Board : परिसरातील साखरबाहुली येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या बाबा शेख फरीद दर्गाह येथील कमिटीच्या वतीने आर्थिक अफरातफरी केल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी वक्फ बोर्डाकडे केली होती. यावर वक्फ बोर्डाच्या अधिकार्‍यांनी दर्गाहचे लेखा परीक्षणाची चौकशी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा साखरबाहुली दर्गाह चौकशीच्या भोवर्‍यात आला आहे.
 
 
girad
 
 
 
काही वर्षांपूर्वी कमिटीचे प्रशासक म्हणून करीमुद्दीन काजी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी करीमुद्दीन काजी यांनी ट्रस्टच्या बँक खात्यात 30 लाख 11 हजार 163 रुपये जमा ठेवले होते. त्यानंतर नवीन कमिटी गठीत करण्यात आली असून गेल्या तीन वर्षांपासून नवीन कमिटीच या दर्ग्याची देखरेख करीत आहेत. दरवर्षी जवळपास 12 लाख रुपये आवक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
 
 
3 वर्षांत 36 लाख रुपये जमा होणे अपेक्षित असून या तीन वर्षात याठिकाणी कोणतीही विकास कामे झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. जमा असलेली जुनी रक्कम व तीन वर्षात नवीन जमा झालेले पैसे गेले कुठे, अशा प्रश्‍न वक्ङ्ग बोर्डाकडे करीत चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर वक्ङ्ग बोर्डाच्या अधिकार्‍यांनी येऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असून चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 
दोषी आढळल्यास जबाबदारी घेऊ : वाहिद अली
 
 
विरोधकांनी वक्फ बोर्डाकडे तक्रार केली होती. यासंबंधी वक्फ बोर्डाच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष येऊन संपूर्ण दस्तऐवजांची पडताळणी करून दस्तऐवज सोबत घेऊन गेले आहेत. आपण अधिकार्‍यांना सहकार्य केले. आपल्यावर आरोप सिद्ध झाल्यास स्वत: जबाबदार राहील, अशी प्रतिक्रीया हजरत बाबा शेख फरीद दरगाहचे अध्यक्ष वाहिद अली यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0