यवतमाळ,
Aurangzeb Tmb Controversy छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुल्दाबाद येथील हिंदूद्वेष्टा, क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हट विण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने उपजिल्हाधिकार्यांमार्फत प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उझ्बेकी परकीय आक्रमक बाबर याचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. वास्तविक हा औरंगजेब अहिल्यादेवीनगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काढून ते खुल्दाबाद येथे आणून पुरण्यात आले व त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली.
याच औरंगजेबाने शीख गुरू तेगबहादुर यांची क्रूर हत्या केली. शीख गुरू गाेविंदसिंह यांच्या दाेन मुलांना ते केवळ मुस्लीम हाेत नाहीत म्हणून भिंतीत जिवंतपणी चिणून मारण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या याच औरंगजेबाने केली.श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर यानेच फोडले. मथुरेला असणाऱ्या सुंदर मंदिरांचा यानेच विध्वंस केला. साेरटी साेमनाथाचे मंदिर पुन्हा एकदा यानेच फोडले. त्र्यंबकेश्वर मंदिर, जेजुरी गडावर यानेच हल्ले केले. हजाराे हिंदूंची क्रूर कत्तल करून त्यांच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून त्यांची विटंबना केली. छत्रपती शाहू महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हिंदूंचे माेठ्या प्रमाणावर धमारतरण केले. अशा क्रूरकर्मा व आततायी औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचे आणि त्याने दिलेल्या अनंत यातनांचे प्रतीक आहे. ही कबर पूर्णपणे नष्ट करावी. परकीयांचे कुठलेही नामाेनिशाण हेनष्टच झाले पाहिजे. हा सारा इतिहास लक्षात घेऊन आपण योग्य पद्धतीने ही कबर पूर्णर्पणे काढून टाकावी. हे न झाल्यास पूर्वसूचना देऊन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल हिंदू समाजाबराेबर छत्रपती संभाजीनगरकडे कारसेवेसाठी कूच करतील व औरंगजेबाची कबर उध्वस्त करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी विदर्भ प्रांत सेवाप्रमुख राम लाेखंडे, मनाेज औदार्य, बजरंग दल विभाग संयाेजक भूपेंद्रसिंह परिहार, उज्ज्वल सैनी, राहूल ढाेके, याेगिन तिवारी, कार्तिक निकम, सागर मिलमिले, अजय उन्हाळे, ईश्वर पिसे, राजू नाडे, उज्ज्वल केने, प्रशांत बुराडे, प्रमाेद काकडे, राजेश दुधे आदी पदाधिकारी उपस्थित हाेते.