तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Priya Tumram : यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयातील पदार्थविज्ञान विषयाच्या सहायक प्राध्यापक डॉ. प्रिया विनायक तुमराम यांना ‘एलईडी लॅम्प’ संबंधीच्या प्रस्तावित संशोधन प्रकल्पासाठी दिल्लीच्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनचे सुमारे 40 लाख रुपयांचे संशोधन अनुदान मंजूर झाले आहे.
प्रा. डॉ. तुमराम यांच्या संशोधन प्रकल्पाचे शीर्षक ‘लॅन्यानाईड फ्री फॉस्पर्स फॉर एलईडी लॅम्पस’ असे असून या संशोधनासाठी एका ज्युनिअर रिसर्च फेलोचे अनुदानित साह्य घेण्याचीही मान्यता मिळाली आहे. या प्रस्तावित संशोधन कार्याचे केंद्र अमोलकचंद महाविद्यालयाची सुसज्ज फिजिक्स प्रयोगशाळा असून, संशोधन कालावधी तीन वर्षे असेल.
विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा, सचिव सीए प्रकाश चोपडा, उपाध्यक्ष डॉ. ललित निमोदिया तसेच प्राचार्य डॉ. राजेंद्र भांडवलकर यांनी प्रा. डॉ. प्रिया तुमराम यांच्या संशोधनाला शुभेच्छा दिल्या आहेत.