नागपूर,
Sandipani School Nagpur सांदीपनि शाळेच्या प्रांगणात शिवाजी महाराज जयंती व मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. दोन्ही कार्यक्रम एकत्र साजरे करून मुलांनी दुग्धशर्करायोग साधला.कार्यक्रमाची सुरुवात समीर सामंत रचित ' प्रार्थना ' शाळेतील इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली .यात प्रामुख्याने हेतल टेंबेकर, अद्वैत देवगडे,लक्षिता देशमुख,स्पृहा चौधरी,ईश्वरी काळे,निष्का इंगळे,ग्रंथा शहा हे विद्यार्थी सहभागी होते.
शिवाजी महाराजांच्या जीवनपटातील हिरकणीचा प्रसंग पोवाड्याच्या स्वरूपात सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केला.अवनी गजभिये हिने हिरकणीची भूमिका निभावली. भाविक मुसळे शिवाजी महाराज, आसावरी जिजामाता ,मंदार,निर्मित,कश्यप ह्यांनी मावळ्यांची भूमिका केली.Sandipani School Nagpurअभिजात दर्जा म्हणजे काय ,तो मराठी भाषेला कसा मिळाला,त्याचे फायदे काय हे सांगणारा एक फलक यावेळी प्रदर्शित करण्यात आला होता.भाषा वापरल्याने तिचा प्रसार होतो म्हणून रोजच्या जीवनात मराठी बोलावे असे शाळेच्या प्राचार्या भारती बिजवे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले.इयत्ता ६वी च्या साईराज,अबीर,वरद या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने झाली. शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्तम आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मुलांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सौजन्य:स्मिता बोकारे,संपर्क मित्र