तभा वृत्तेसवा
वर्धा,
murder case : जावायाचा खून करणारा आरोपी साळा अजय भुरे रा. पुलफैल याला 10 वर्षांचा सश्रम कारावास आणि दंड ठोठावला. हा निर्वाळा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारूका यांनी दिला.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, अमित निमसडे याने अजय भुरे याच्या बहिणीला पळवून नेत लग्न केले होते. काही दिवसांनी अमित व त्याच्या पत्नीचे वाद सुरू झाले. त्यामुळे ती माहेरी आली होती. दरम्यान, 14 ङ्गेब्रुवारी 2021 रोजी अजय भुरे याने बहिणीला अमित चांगला वागवत नसल्याच्या कारणाहून त्याच्यावर चाकूने वार करून त्याला ठार केले. माहितीवरून अमितचा मोठा भाऊ सुधीरने जावून पाहिले असता अजय अमितवर चाकूने वार करताना दिसला.
या प्रकरणी सुधीर निमसडे याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक, निर्मला किन्नाके यांनी केला. तपासा दरम्यान आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारतर्ङ्गे जिल्हा सरकारी अभियोक्ता गिरीष तकवाले यांनी कामकाज पाहिले. शासनातर्ङ्गे 13 साक्षीदार तपासले.